Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) ‘शिवस्मारकासाठी नद्यांचे पाणी आणणे, हा वैदिकीकरण करण्याचा प्रयत्न !’

कधी नव्हे एवढी हिंदु ऐक्याची 
आवश्यकता असतांना जातीद्वेषी सूत्रांची 
खुसपटे काढणारे हिंदुद्वेषी पुरुषोत्तम खेडेकर !
         मुंबई, २२ डिसेंबर - अरबी समुद्रात बांधण्यात येणार्‍या शिवस्मारकासाठी नद्यांचे पाणी आणण्यात येणार आहे. जिवंतपणी महाराजांना वैदिक अधिकार नाकारणार्‍यांचा हा वैदिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या भव्य शिवस्मारकाचे उद्घाटन २४ डिसेंबरला होणार आहे.
त्यांनी म्हटले आहे -
१. अरबी समुद्रात अश्‍वारूढ पुतळा उभारण्यापेक्षा सिंहासनाधिष्ठित पुतळ्याची देखभाल करणे सोपे असल्याने तो उभारण्यात यावा. घोड्यावरचे शिल्प केवळ युद्धजन्य अवस्था प्रदर्शित करते. ही शिल्पे स्फूर्तीदायक असतात, परंतु समृद्धी, शांतता, लोकशासन आणि लोककल्याणकारी महाराज हा संदेश प्रदर्शित होतोच असे नाही. महाराज सर्व मानवांप्रती पालक आणि विश्‍ववंदनीय होते. यासाठी महाराजांचे शिल्प महाभव्य; परंतु सिंहासनाधिष्ठित असे प्रसन्न मुद्रेतील आणि प्रेरणादायी असावे. (महाराजांनी महाआक्रमक मुगलांशी घनघोर लढाया करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; म्हणून ते सिंहासनावर बसू शकले आणि लोककल्याणकारी राजा होऊ शकले. त्यामुळेच शांतता आणि समृद्धी प्रस्थापित झाली. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी खंडणी घेत असल्याचा आरोप असणार्‍या हिंदुद्वेषी खेडेकरांना नेमका ‘मुगलांशी युद्ध करणारे छत्रपती’ हा इतिहास पुढे आणून द्यायचा नाही, हेच त्यांच्या वरील मागणीवरून सुस्पष्ट होते. ‘मुगलांचा पराजय कराणारा हिंदु राजा’ ही छत्रपतींची ओळख खेडेकरांना पुसायची आहे; परंतु तीच योग्य असल्याने लढवय्या स्थितीतील पुतळाच उभारला जाणे योग्य आहे. - संपादक)
२. समुद्रात बोटीने येणे-जाणे खर्चिक होईल, तसेच पावसाळ्यामध्ये शिवस्मारकाच्या दर्शनासाठी जाता येणार नाही. पर्यावरणाला धोका निर्माण होणार्‍या याचिका न्यायालयात गेल्याने शिवस्मारक मागे पडू शकते. राजभवन मंत्रालयासमोरील सर्व बंगले पाडून तेथे उंच आणि सिंहासनाधिष्ठित स्मारक उभे करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांचे काम चालू झाले असून शिवस्मारकाचे काम मात्र रामभरोसे आहे. जयललितांचे स्मारक १ सहस्र फूट उंच झाल्यास शिवस्मारक जगातील सर्वांत उंच असणार नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn