Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आनंदी आणि कुटुंबियांना साधना करण्यासाठी पाठिंबा देणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे मिरज येथील श्री. रमेश वांडरे !

श्री. रमेश वांडरे
      ‘माझे धाकटे दीर श्री. रमेश वांडरे यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली’, हे ऐकून आम्हा सर्वांना फार आनंद झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी आम्हा वांडरे कुटुंबियांना अनमोल भेट दिली. त्यासाठी गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. 
१. आनंदी आणि मनमोकळा स्वभाव 
     माझे लग्न झाले, तेव्हा ते ७ - ८ वर्षांचे होते. त्यांचा स्वभाव गोड आणि मनमोकळा आहे. ते सतत आनंदी असतात. मला ते माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत. सर्व भावंडांमध्ये त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांच्याशी माझी गट्टी जमत असे. त्या वेळीही त्यांच्याशी बोलण्यातून आनंद मिळत असे.
२. प्रेमभाव 
     तेे माझ्या दोन्ही मुलांवर पुष्कळ प्रेम करायचे. मुले त्यांना ‘काका’ म्हणत नसत, तर ‘दादा’ म्हणत. नोकरीच्या निमित्ताने आम्ही बाहेरगावी असायचो आणि दिवाळी अन् उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी यायचो. तेव्हा ‘त्यांच्याशी बोलावे’, असे वाटत असे. त्यांच्यातील प्रेमभाव आम्हाला आकर्षून घेत असे. 
३. दहावीपर्यंत शिक्षण घेऊन फुलांचा व्यवसाय चालू करणे 
      आमची आर्थिक स्थिती त्या वेळी बेताचीच होती. त्यांना पुढील शिक्षणाविषयी सांगितल्यावर ते हसून ‘आता कुठे नोकर्‍या मिळतात ?’, असे बोलून तो विषय टाळत असत. त्यांनी १० वीपर्यंत शिक्षण घेऊन लगेच फुलांचा व्यवसाय चालू केला. 
४. आसक्ती नसणे 
        त्यांना कशाचीही आसक्ती नाही. ते कधीही पैशाच्या मागे लागले नाहीत. 
५. पत्नी आणि मुले यांना साधना करण्यासाठी पाठिंबा देणे 
      साधना समजल्यावर ते जमेल तशी साधना करू लागले. पत्नीला आणि मुलांना त्यांनी साधनेला कधीही विरोध केला नाही. उलट जमेल तेवढा पाठिंबा दिला. त्यांनी अजिंक्यला पूर्णवेळ साधनेसाठी आश्रमात पाठवल्यावर त्यांना किती साधनेची ओढ आहे आणि त्यांच्यात किती गांभीर्य रुजले आहे, हे लक्षात आले. 
६. जाणवलेले पालट 
६ अ. भाव वाढल्याचे जाणवणे : दोन वर्षांत त्यांचा भाव पुष्कळ वाढल्याचे लक्षात आले. ते नेहमी भावाच्या स्तरावर बोलायचे. 
६ आ. सहवासात आनंद वाटणे : सांगलीला घरी आले की, मला पुष्कळ आनंद होत असे. 
७. पूर्वसूचना 
     आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक झाल्याचे जाणवणे : ४ - ५ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) मला जाणीव झाली की, त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक झालेली आहे. मला त्याची प्रचीतीही लगेच आली आणि पुष्कळ आनंद झाला. 
      हे केवळ गुरुकृपेने लिहून देऊ शकले. ‘त्यांची अशीच उत्तरोत्तर आणखी प्रगती होवो’, हीच गुरुचरणी प्रार्थना !’
- सौ. कमल वांडरे (श्री. रमेश वांडरे यांची भावजय), विश्रामबाग, सांगली. (नोव्हेंबर २०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn