Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘सनबर्न’ला विरोध !

सनबर्नसारख्या कार्यक्रमांवर शासनाने तात्काळ बंदी आणावी ! - ह.भ.प भानुदास तुपे महाराज, हडपसर 
   सनबर्न फेस्टिव्हलसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. तरुण पिढीला व्यसनाधीनतेचा विळख्यातून वाचवण्यासाठी शासनाने तात्काळ या कार्यक्रमांवर बंदी आणावी. या कार्यक्रमाच्या विरोधात सर्व कीर्तनकारांच्या माध्यमातून जनजागृती करू.
हिंदु संस्कृती नष्ट करणार्‍या कार्यक्रमांना विरोधच ! - ह.भ.प. तांबे महाराज, थेऊर 
   हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करणार्‍या कार्यक्रमांना आमचा तीव्र विरोध असून समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सनबर्न फेस्टिव्हलचा तीव्र निषेध करून त्याला विरोध करायला हवा. शासनानेही याची दाखल घेऊन हा कार्यक्रम रहित करावा.
हा कार्यक्रम रहित होण्यासाठी आम्ही तुमच्यासमवेत आहोत ! 
- सौ. सुलभा उबाळेशिवसेना गटनेत्या, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 
   भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना मानाचे आणि आदराचे स्थान आहे. ‘सनबर्न फेस्टिव्हल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे हनन होणार आहे. त्यामुळे आमचा या कार्यक्रमाला विरोध आहे, तसेच हा कार्यक्रम रहित होण्यासाठी आम्ही तुमच्यासमवेत आहोत.
भारतीय संस्कृती उच्च आहे. सनबर्नच्या माध्यमातून परदेशी
संस्कृतीचे अतिक्रमण आमच्यावर अजिबात नको.

- श्री. विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे. 
   सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे हिंदु संस्कृती नष्ट करण्याचे षड्यंत्रच आहे. या संदर्भात सर्व स्तरावर जनजागृती करून याचा विरोध करायला हवा. - ह.भ.प ज्योतिषाचार्य नंदुकाका रहाणे, फुरसुंगी
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn