Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

खोट्या धाडी घालून बेहिशोबी पैसा हडपणारे पोलीस, हवालदार आणि दलाल यांना अटक !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचेच लक्षण !
नवी मुंबई, ६ डिसेंबर - बेहिशोबी काळा पैसा बाळगणार्‍या व्यक्तीचे पैसे पांढरे करून देण्याची बतावणी करून त्याला लुटणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक, हवालदार आणि दलाल यांना खांदेश्‍वर पोलिसांनी अटक केली आहे. (अशा गुन्हेगार पोलिसांविषयी शासनाला काय म्हणायचे आहे ? - संपादक)
  • शीघ्र कृती दलात साहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले देवीदास घाडे यांनी पोलीस ठाण्यातील हवालदार श्याम पाटील आणि काळे नावाच्या दलालाच्या साहाय्याने कट रचला.
  • काळे याने मुंबईतील एका व्यक्तीला संपर्क करून तिच्याकडील बेहिशोबी काळा पैसा पांढरा करण्याचे आमिष दाखवले.
  • ठरल्याप्रमाणे ती व्यक्ती ४६ लक्ष ५० सहस्र रुपये मूल्यांच्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन खांदेश्‍वर येथे आली. त्या वेळी काळे याने साहाय्यक निरीक्षक घोडे यांनाही तेथे बोलावले आणि खोटी धाड टाकली. घोडे यांनी शासनाधीन केलेली रक्कम स्वत:कडे ठेवून कारवाई टाळण्याच्या उद्देशाने संगनमताने व्यक्तीला सोडून दिले.
  • काही दिवसांनी कारवाई करण्याचे भय दाखवत त्या व्यक्तीकडे अधिक पैशांची मागणी करण्यात आली. शेवटी त्या व्यक्तीने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला या प्रकरणाची माहिती दिली. नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या आयुक्तांनी या प्रकरणाची नोंद घेऊन खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून अटकेची कारवाई केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn