Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

फरिदाबाद येथे गीता जयंती महोत्सवात सनातनच्या साधिका सौ. संदीपकौर मुंजाल यांचा सत्कार

डावीकडून मूलचंद शर्मा,
आयुक्त सौ. सोनल गोयल, सौ. संदीपकौर
मुंजाल यांचा सत्कार करतांना कृष्णपल गुर्जर
     फरिदाबाद - गीता जयंती महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून हुड्डा संमेलनकेंद्रात एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. संदीपकौर मुंजाल यांनी, ‘श्रीमद्भगवद्गीता आणि स्वभावदोष निर्मूलन याविषयी माहिती दिली. त्यांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे ‘योगः कर्मसु कौशलम् ।’चे ध्येय आणि समाज अन् राष्ट्र यांचे उत्थानही कसे साध्य होऊ शकते, यांविषयी माहिती दिली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या शेवटी नगरपालिका आयुक्त सोनल गोयल यांनी सनातनच्या सौ. संदीपकौर मुंजाल यांचा शाल देऊन, तर सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपल गुर्जर यांनी स्मृतीचिन्ह भेट देऊन सत्कार केला. या वेळी वल्लभगडचे आमदार मूलचंद शर्मा, फरिदाबाचे उपायुक्त चंद्रशेखर आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 
क्षणचित्र 
     गीता जयंती या कार्यक्रमानंतर आयुक्त सोनल गोयल यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn