Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दत्तजयंती

     एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.
इतिहास
     ‘पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत अनिष्ट शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी अनिष्ट शक्तींच्या निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.’
महत्त्व
     दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १,००० पटींनी कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा लाभ मिळण्यास साहाय्य होते.
जन्मोत्सव साजरा करणे
     दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच ‘गुरुचरित्रसप्ताह’ असे म्हणतात. भजन, पूजन आणि विशेषकरून कीर्तन इत्यादी भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तमिळनाडूमध्येही दत्तजयंतीची प्रथा आहे. 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’)
दत्ताला करावयाच्या काही प्रार्थना
१. हे दत्तात्रेया, तू जसे चोवीस गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना.
२. हे दत्तात्रेया, भुवलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती दे.
३. हे दत्तात्रेया, अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून तू माझे रक्षण कर. तुझे संरक्षक-कवच माझ्याभोवती सदोदित असू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना. 
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘प्रार्थना’)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn