Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भाजप सरकारने विकासाबरोबर हिंदुत्वाकडेही लक्ष द्यावे ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, खासदार, भाजप

केवळ डॉ. स्वामीच असे बोलण्याचे धाडस दाखवतात !
नवी देहली - केवळ विकासाच्या गोष्टी केल्या जात आहेत. आर्थिक विकास अपरिहार्य आहे; मात्र ते पुरेसे नाही. देशातून भ्रष्टाचार समाप्त करणे आणि हिंदुत्व यांकडे भाजपने लक्ष द्यायला हवे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथे केले. 
   डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, वाजपेयी यांच्या काळात इंडिया शायनिंगचा नारा देण्यात येऊनही पक्ष पराभूत झाला. नरसिंह राव यांनी आर्थिक सुधारणेद्वारे देशाचा विकासदर वाढवूनही त्यांचा पराभव झाला. राजीव गांधी यांनी औद्योगिक क्षेत्रात प्रगती घडवून आणल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. मोरारजी देसाई यांनीही आर्थिक सुधारणा केल्या, तरीही त्यांचा पराभव झाला. म्हणजेच विकासामुळे विजय मिळत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. वर्ष २०१४ च्या निवडणुकीत मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदूंच्या मतांमध्ये विभाजन असे राजकारण झाले होते. आता मात्र हिंदूंना संघटित करण्याची आवश्यकता आहे. वर्ष २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला हिंदूंची ३१ टक्के मते मिळाली होती. त्याच विचारानुसार पक्ष चालला, तर पुढे ही टक्केवारी ४० होऊ शकते. हिंदुत्वाचा विचार म्हणजे अन्य धर्मियांचा द्वेष करणे, असा नसून हिंदूंमधील वाईट गोष्टी दूर करून त्यांना संघटित करणे असा आहे. डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, देशात दलाल २५ टक्के दलाली घेऊन काळे पैसे पांढरे करून देत आहेत. यात बँक अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. यामुळे नोटाबंदीनंतर आयकर कायद्यात केलेल्या सुधारणांचा विशेष परिणाम होणार नाही.
राममंदिरांची पायाभरणी केल्याविना उत्तरप्रदेशची सत्ता
प्राप्त करण्याचा विचार भाजपने सोडून द्यावा !
- शिवसेना
केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतरही राममंदिर बांधण्याविषयी मौन पाळणारे उत्तरप्रदेशातील सत्ता मिळाल्यानंतरही त्याची निर्मिती करतील, यावर कोण विश्‍वास ठेवणार ?
   लक्ष्मणपुरी - भाजपने राममंदिराची पायाभरणी केल्याविना उत्तरप्रदेश राज्याची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पहाणे सोडून द्यावे; कारण राममंदिर भारतातील कोट्यवधी रामभक्तांच्या धार्मिक भावना आणि प्रतिष्ठेशी जोडलेले आहे, असे परखड विधान लक्ष्मणपुरीचे शिवसेनेचे महानगरप्रमुख श्री. अभिषेक अग्नीहोत्री यांनी केले. केंद्रात भाजपला सरकारमध्ये बसवल्यानंतर भाजपने हिंदूंना राममंदिर बांधून रिटर्न गिफ्ट द्यायला हवे, असेही ते म्हणाले. बाबरी मशिदीच्या पतनाच्या २४ व्या वर्षानिमित्त ६ डिसेंबरला येथे शिवसैनिकांनी शौर्यदिन साजरा केला. तसेच या आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि वाहनफेरीही काढली. 
   अग्नीहोत्री म्हणाले की, या वेळी शिवसेना राज्यात २०० जागांवर निवडणूक लढवणार आहे. जर आगामी सरकारमध्ये शिवसेनेला वाटा मिळाला, तर शिवसेना राममंदिराच्या स्थापनेसाठी कटीबद्ध असेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn