Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

घरात नोटा बाळगणे हा गुन्हा आहे का ? - कर्नाटक उच्च न्यायालय

      बेंगळुरू - घरात नोटा बाळगणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्‍न कर्नाटक उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला (सीबीआयला) विचारला आहे. यावर सीबीआयने, स्वतःकडे नोटा बाळगणे हा गुन्हा नाही असे उत्तर न्यायालयाला दिले आहे.
     कर्नाटकमधील कंत्राटदार इब्राहिम शेरीफ यांच्या घरावर आयकर विभागाने १ डिसेंबरला धाड टाकली होती. शेरीफच्या घरातून ४ कोटी ८० लाख रुपये जप्त करण्यात आले होते. यामध्ये सर्व नवीन नोटांचा समावेश होता. या प्रकरणी शेरीफ यांनी अटक टाळण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. शेरीफ यांचे अधिवक्ता सी.एच्. जाधव न्यायालयात म्हणाले होते, शेरीफ यांच्यावर प्राप्तिकर कायद्यानुसार बेहिशोबी रकमेच्या अंतर्गत कारवाई होऊ शकते; पण बेहिशोबी रक्कम घोषित करण्यासाठी अद्याप ३१ मार्च २०१७ पर्यंतचा कालावधी आहे. सीबीआयने कंत्राटदाराचा दावा फेटाळून लावला होता. या वेळी सीबीआयने कंत्राटदाराला अटक होणार नाही, अशी निश्‍चिती न्यायालयात दिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn