Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पोलीस प्रशासनाकडून सुविधांची वानवा !

नागपूर शहरात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस उपाशी !
      नागपूर, ५ डिसेंबर (वार्ता.) - शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह २२ उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक आणि ५ सहस्र ८०० कर्मचारी हिवाळी अधिवेशनाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. पोलिसांच्या शरीरावरही छायाचित्रक (कॅमेरे) लावले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातून साडेसात सहस्र पोलिसांचा ताफा येथे दाखल झाला आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे; मात्र पोलीस यंत्रणेकडून सर्व पोलिसांना पुरेशा प्रमाणात सुविधा पुरवण्यात येत नसल्याने पोलिसांची उपासमार होत आहे. केवळ विधानभवन, रविभवन, रामगिरी, सचिवालय अशा ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना वेळेवर जेवण आणि न्याहारी मिळत आहे.       या वर्षी ड्रोनसोबतच स्पाय कॅमेर्‍याचाही वापर करण्यात येणार आहे. शिवाय फोर्सवन, शीघ्र कृती दल आणि राज्य राखीव दलाचे जवानही सज्ज रहाणार आहेत. हिवाळी अधिवेशनात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातून आलेल्या अनेक पोलिसांना शहरातील अनेक भागांची माहिती नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ आणि जेवण कुठे मिळते याची त्यांना शोधाशोध करावी लागते. शहरातील पोलिसांशी चर्चा केली असता अनेक पोलिसांनी बंदोबस्ताच्या ठिकाणी आम्हाला साधे पाणीही मिळत नाही. लघुशंका करण्यासाठी कोठे जायचे हा प्रश्‍न आहे. काही दुकानदार आणि लोक यांच्या घरातून पाणी मागून प्यावे लागते. न्याहारी आणि जेवण करण्यासाठी पुरेसा भत्ताही आम्हाला मिळत नाही. हे अधिवेशन म्हणजे आमच्यासाठी डोकेदुखीच आहे. (सरकार आणि प्रशासन पोलिसांच्या या असुविधेकडे लक्ष देणार का ? - संपादक)


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn