Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जन्म झाला आमुचा केवळ तुझ्या सेवेसाठी ।

सौ. विद्या शानभाग
हे सद्गुरुराया, जन्म झाला आमुचा केवळ तुझ्या सेवेसाठी ।
कृपा प्राप्त करण्या दिली संधी मोठी ॥ १ ॥
पावलोपावली करता तुम्ही मार्गदर्शन ।
दिले जीवन्मुक्त होण्यासाठी साधनेचे अमूल्य धन ॥ २ ॥ जरी असला विवाह प्रारब्धात ।
तुम्हीच ठेवले आम्हाला साधनेच्या विचारात ॥ ३ ॥
भीती होती मनात साधना न होण्याची ।
नंतर गवसले आहोत ।
वाघाच्या (टीप १) तोंडातले सावज आम्ही ॥ ४ ॥
श्रीविष्णुस्मरणात, सद्गुरु सहवासात ।
महर्षींच्या चाकरीत आहेत माझे पती (टीप २) ।
गुरूंचे स्मरण, सेवेचे चिंतन, कर्तेपणा अर्पण ।
मनाचे मंथन हेच आहे त्यांच्या अंगी ॥ ५ ॥
कृतज्ञ गुरुराया, तुम्ही दिली त्यांच्याकडून शिकण्याची संधी ॥
माता तुम्ही, पिता तुम्ही, बंधू तुम्ही, सर्वस्व तुम्ही ॥ ६ ॥
ही दोन फुले सदैव कृतकृत्य असणार ।
आणि धन्य होणार केवळ तुमच्या चरणी ॥ ७ ॥
टीप १ - गुरूंच्या रूपात. वाघ तोंडातले सावज सोडत नाही.
टीप २ - पती विनायक शानभाग
(दत्तजयंतीच्या दिवशी लग्नाचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त गुरुचरणी अर्पण केलेली कृतज्ञता !)
- सौ. विद्या शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१३.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn