Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परदेशात रहाणार्‍यांमध्ये सर्वाधिक भारतीय नागरिक !

    वॉशिंग्टन - १ कोटी ५६ लाख भारतीय नागरिक परदेशात रहात आहेत, अशी माहिती प्यू रिसर्चच्या अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार अन्य देशांमध्ये स्थलांतर करणार्‍या नागरिकांच्या सूचीत भारत प्रथम क्रमांकावर आहे. 
  • आंतरराष्ट्रीय प्रवासी दिनाच्या निमित्ताने आकडेवारी घोषित करण्यात आली आहे. जागतिक लोकसंख्येच्या ३.३ टक्के लोक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित आहेत. जगातील हे लोक एकाच देशात राहिले असते, तर तो जगातील ५ वा सर्वांत मोठा देश असला असता. या देशात २४.४ कोटी नागरिक असले असते.
  • वर्ष २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ३५ लाख भारतीय नागरिक संयुक्त अरब अमिरातमध्ये रहातात. वर्ष १९९० नंतर यात मोठी वाढ झाली.
  • इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे ४ कोटी ६६ लाख स्थलांतरित नागरिक रहातात.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn