Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प्लास्टिक नोटा चरबीविरहित असाव्या, ही अपेक्षा !

      सध्या केंद्रशासनाने काळा पैसा आणि खोट्या नोटा बाहेर काढण्यासाठी जुन्या नोटांवर बंदी घातली आहे. तसेच शासन देशामध्ये ‘कॅशलेस’ व्यवहार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याचसमवेत खोट्या नोटा बंद होण्यासाठी प्लास्टिक नोटा छापता येतील का, याचा प्रस्तावही केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन आहे. गेल्या काँग्रेस सरकारने वर्ष २०१४ मध्ये प्लास्टिक नोटांविषयीची माहिती संसदेत दिली होती. त्यानुसार देशातील म्हैसुरू, जयपूर, कांची, सिमला आणि भुवनेश्‍वर या शहरांमध्ये प्लास्टिक नोटा प्रायोगिक तत्त्वावर वापरण्याचा विचारही झाला होता; परंतु पुढे प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही.
     सध्या जगभरातील ३२ देशांमध्ये प्लास्टिक नोटा वापरल्या जातात. त्या नोटांचा सर्वप्रथम वापर ऑस्ट्रेलिया या देशाने खोट्या नोटा आणि काळा पैसा यांच्यावर आळा घालण्यासाठी चालू केला. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सर्वच नोटा या प्लास्टिकच्या आहेत. प्लास्टिक नोटांची वैशिष्ट्ये सांगतांना असे म्हटले जाते की, त्या नोटांचे आयुष्य हे कागदी नोटांच्या तुलनेत १० पट अधिक असते. त्या नोटांचे छायाचित्र घेता येते; पण त्यांची वैशिष्ट्ये आणि गुणवत्ता यांची नक्कल करता येत नाही. त्यामुळे खरी आणि खोटी नोट यांची ओळख लगेचच करता येते. मुख्य म्हणजे प्लास्टिक नोटांमुळे कागदी नोटांसाठी लागणारा कच्चा माल वाचतो. तसेच त्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर त्यावर पुनर्प्रक्रिया करून इतर वस्तू सिद्ध करता येतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार प्लास्टिक नोटा या पर्यावरणपूरक आणि टिकाऊ असतात.
     असे असले तरी प्लास्टिक नोटा सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत प्राण्यांच्या चरबीचा वापर करावा लागतो, असे लक्षात आले आहे. नुकतेच ब्रिटनमध्ये तेथील प्रमुख अधिकोषांनी (बँकांनी) प्लास्टिक नोटा छापल्या आणि त्यामध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जातो. त्यामुळे तेथील हिंदु आणि अन्य धर्मीय नागरिकांनी ५ पौंडेच्या नोटेवर बहिष्कार घातला असून धार्मिक कार्यक्रमात प्लास्टिक नोटा वापरण्यास बंदी केली आहे. याचसमवेत तेथील धार्मिक लोकांनी त्या प्लास्टिक नोटांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम घेऊन सरकारला त्याविषयी निवेदनही दिले. सध्या हा वाद ब्रिटनच्या न्यायालयात चालू असून लवकरच त्याचा निकाल लागेल.
     आपल्याकडेही आता प्लास्टिक नोटांचा विचार चालू असून त्यामध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत हा हिंदूंचा देश असून येथे पैशाला ‘श्री लक्ष्मीदेवी’ म्हणून पुजले जाते. त्यामुळे अनेक धार्मिक कार्यक्रम आणि मंदिरे या ठिकाणी पैसे दान केले जातात अन् वापरले जातात. त्यामुळे केंद्रशासनाने प्लास्टिक नोटा सिद्ध करतांना प्राण्यांची चरबी वापरली जाता कामा नये, याची १०० टक्के काळजी घेऊन हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करावा, हीच हिंदूंची आग्रही अपेक्षा आहे. 
- श्री. भूषण कुलकर्णी, पुणे
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn