Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दैवी कण : प्रकार, वैशिष्ट्ये आणि कार्य !

कु. मधुरा भोसले
१. दैवी कणांचे आकार
अ. लहान : १ मि.मी. हून लहान 
आ. मध्यम : १ मि.मी.
इ. मोठा : १ मि.मी. हून अधिक 
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.११.२०१६, रात्री ९.२१)
२. स्थुलातून आणि हवेत सूक्ष्मातून दिसणार्‍या दैवी कणांचे आकार, वैशिष्ट्ये आणि कार्य
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०१६, रात्री ९.४४)
३. विविध दैवी कणांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्यांचे एकमेकांत होणारे रूपांतर 
३ अ. विविध दैवी कण ईश्‍वरी चैतन्याच्या लहरींद्वारे एकमेकांशी जोडलेले असणे : विविध प्रकारच्या दैवी कणांचे कार्य निराळे असल्यामुळे त्यांच्यामध्ये काही भेद जाणवतो. विविध स्तरांवर कार्यरत असणारे दैवी कण ईश्‍वरी चैतन्याच्या लहरींच्या जाळ्याने एकमेकांशी जोडलेले असतात. 
३ आ. विविध अवस्थांतील दैवी कणांमध्ये ईश्‍वरेच्छेनुसार कार्यानुमेय पालट होऊन त्यांचे एकमेकांमध्ये रूपांतर होत असणे : कार्यानुमेय स्थुलातून दिसणार्‍या काही दैवी कणांचा रंग पालटणे, दैवी कण अधिक प्रकाशमान दिसणे, यांसारखे पालट दैवी कणांमध्ये होतात, तसेच काही दैवी कणांचे रूपांतर प्रकाशकणांमध्ये होते. सुप्तावस्थेत कार्यरत असणारे काही दैवी कण अंधारात कार्यरत होतात. अशा प्रकारे ईश्‍वराच्या इच्छेनुसार एका अवस्थेतील दैवी कणांचे रूपांतर दुसर्‍या अवस्थेमध्ये होत असते. 
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.११.२०१६, रात्री ९.२१) 
दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn