Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संस्कृतीविरोधी ‘सनबर्न’ला भाजप सरकारचा पाठिंबा !

  • जनता संस्कृतीहीन बनेल, असे कार्यक्रम ठेवणे भाजप सरकारकडून अपेक्षित नाही ! अशा कार्यक्रमांतून महसूल मिळाल्याने भौतिक विकास होईल; पण जनतेची अधोगती होईल. संस्कृतीचे रक्षण केल्यास ईश्‍वर विकासासाठी महसूल अल्प पडू देणार नाही, असा विश्‍वास का नाही ? 
सनबर्न फेस्टिव्हलमुळे पर्यटनाला चालना मिळून 
सरकारचा महसूल वाढेल ! - पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल
         पुणे, २३ डिसेंबर (वार्ता.) - सनबर्न संगीत फेस्टिव्हलमुळे पर्यटनाला चालना मिळून सरकारचा महसूल वाढेल. पुण्यातील तरुणाईची आवड लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. काळाप्रमाणे लोकांच्या विचारसरणीत आणि सांस्कृतिक विचारांमध्ये पालट होत आहेत, असे सांगत पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी संस्कृती भ्रष्ट करणार्‍या आणि अमली पदार्थांच्या माध्यमातून व्यसनाधीनेतला चालना देणार्‍या सनबर्न संगीत फेस्टिव्हलला पाठिंबा घोषित केला. (राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत भारतीय संस्कृतीचे अधःपतन करणारे कार्यक्रम होणे दुर्दैवी ! पर्यटन आणि महसूल यांमध्ये वाढ होण्यासाठी संस्कृतीहीन कार्यक्रमांचा आधार का घ्यावा लागतो ? - संपादक)
         सनबर्न कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन केले जाते. यापूर्वी गोव्यामध्ये झालेल्या सनबर्न कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तरुण-तरुणी सार्वजनिकरित्या हुक्का, तसेच चिलिम ओढतांना, तसेच तात्पुरत्या प्रसाधनगृहांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करतांना आढळले होते. सनबर्नच्या अशा भयावह पूर्वेतिहासासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता जयकुमार रावल यांनी ‘कायद्याने अमली पदार्थांचे सेवन करण्यास बंदी आहे. सनबर्नमध्ये अमली पदार्थ सेवन करतांना कुणी आढळल्यास कारवाई करू, असे उत्तर रावल यांनी २३ डिसेंबरला पत्रकार परिषदेत दिले. (नव्याने अमली पदार्थांचे सेवन होण्याची वाट कशाला पहायची ? पूर्वानुभव लक्षात घेऊन सरकारने कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)
         हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळामध्ये लाल महाल उत्सव समितीचे श्री. चंद्रशेखर शिंदे, फुरसुंगीचे ग्रामोपाध्याय श्री. नंदू काका रहाणे, युवा सेनेचे नेते श्री. किरण साळी, धर्माभिमानी सौ. शुभांगी आफळे, रणरागिणी शाखेच्या सौ. नेहा मेहता, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे आणि श्री. दीपक आगवणे उपस्थित होते.
-------------------------------------------
भाजपच्या आमदार माधुरी 
मिसाळ यांचे असंस्कृत विधान !
(म्हणे) ‘कुणी कसे कपडे 
घालायचे हा महिलांचा वैयक्तिक प्रश्‍न !’
         ‘सनबर्नसारख्या कार्यक्रमांमध्ये कोणतीही आचारसंहिता अथवा पोशाखसंहिता असत नाही. आतापर्यंतच्या अनुभवावरून अशा कार्यक्रमांमधून अनैतिकतेला खतपाणी मिळत असल्याचे दिसून येते. अशा कार्यक्रमांच्या आयोजनांमुळे तरुणांचे नैतिक अधःपतन झाले, तर त्याचे दायित्व कोणाचे ?’ असा प्रश्‍न हिंदुत्वनिष्ठांनी उपस्थित केल्यावर भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे पित्त खवळले. ‘महिलांच्या कपड्यांच्या संदर्भात बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. कोणते कपडे घालायचे हा महिलांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. सर्व जण सूज्ञ असतात. तुम्ही काही संस्कृतीचा ठेका घेतलेला नाही. या संदर्भात तुम्ही बोलू नका’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी हिंदुत्वनिष्ठाचे बोलणे तोडले.
-------------------------------------------
संस्कृतीरक्षणासाठी सनबर्नच्या विरोधातील
 आंदोलन चालूच ठेवणार ! - हिंदुत्वनिष्ठांची प्रतिक्रिया
         ‘सनबर्न’ कार्यक्रमाला संस्कृतीप्रेमींचा मोठ्या प्रमाणावर विरोध होत असून सुसंस्कृतपणाला गालबोट लावणारा हा कार्यक्रमच रहित करण्यात यावा, अशी मागणी संस्कृतीप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केली आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठांनी ‘युवाजागृती आणि संस्कृतीरक्षण’ हे अभियान चालूच ठेवण्याचे, तसेच तरुणांचे प्रबोधन करण्याचे प्रयत्न चालूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही, तर या संदर्भात राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------------------------------------
         पत्रकार परिषदेनंतर हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने जयकुमार रावल यांची भेट घेऊन त्यांना सनबर्नच्या इतिहासाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या वेळी ‘‘कोणावरही आपण ‘मॉरल पोलिसिंग’ करू शकत नाही. कुणी कसे कपडे घालावेत, कसे वागावे, याचे वैयक्तिक दायित्वही असते. त्या ठिकाणी कायदाबाह्य कोणतीही गोष्ट होणार नाही. काही चुकीच्या गोष्टी आढळल्या, तर पुढच्या वर्षी अनुमती रहित करता येऊ शकते’ असे सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn