Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राजकीय पक्षांना जुन्या नोटांमध्ये देणग्या घेता येणार नाहीत ! - अरुण जेटली

     नवी देहली - ३० डिसेंबरपर्यंत राजकीय पक्ष बँकांमध्ये ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांमधील देणगीचे रोख पैसे जमा करू शकतात; मात्र त्या जुन्या नोटा देणगीच्या स्वरूपात त्यांना स्वीकारता येणार नाही; कारण त्या बाद करण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे. तसेच जमा करण्यात आलेल्या नोटांच्या उत्पन्नाचे स्रोत सांगणे अपरिहार्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
     राजकीय पक्षांच्या खात्यात जमा होणार्‍या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांवर कोणताही कर लागणार नाही. राजकीय पक्षांना पहिल्यापासूनच आयकर कायद्यातून सूट आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यात किती रक्कम जमा होते, त्यावर सरकार आणि आयकर विभागाचे लक्ष आहे. अतिरिक्त रक्कम जमा करणार्‍यांना मोठा दंड आणि कर लावण्यात येत आहे. मात्र राजकीय पक्षांच्या खात्यावरील रकमेविषयी विचारणाही होणार नाही, यावर आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (देशातील राजकीय पक्षांना मिळणार्‍या देणग्या बहुदा रोकडच्या स्वरूपात दिल्या जातात; मात्र आयकर खात्याने कधी राजकीय पक्षांवर या संदर्भात धाडी टाकल्याचे ऐकिवात नाही. आताही एकाही राजकीय पक्षाने बेहिशोबी रक्कम घोषित केली नाही कि जुन्या नोटा बँकेत जमा केलेल्या नाहीत. यामागे काय गौडबंगाल आहे, हे केंद्र सरकारही सांगणार नाही ! असे पक्ष आणि व्यवस्था हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) अपरिहार्य करतात ! - संपादक)

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn