Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ध्यास असो तुझ्या चरणांचा मम हृदयी ।

 परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
                                 परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
                              यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
      ‘वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साजरा करण्यात आला. त्या दिवशी मी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात होते. त्यामुळे ‘अमृत महोत्सवाला मी रामनाथी आश्रमात असायला हवे होेते’, असा विचार माझ्या मनात येऊन रुखरुख लागली. त्या सायंकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी मानस संवाद साधल्यावर मला पुढील काव्यपंक्ती सुचवल्या.
सौ. सारिका आय्या
प.पू. गुरुमाऊली, 
त्रिगुणात्मक साकार मूर्ती तूच ।
चराचरांत व्यापणारी चैतन्यमूर्ती तूच ।
हरिहर श्रीकृष्ण मुरलीधर तूच ॥ १ ॥

जीवन उद्धरण्या जीव तळमळे ।
शरण आले तुझ्या दारी ।
कृपेची भीक घाल पदरी ॥ २ ॥
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सर्वकाही तूच ।
तुझ्याविना नसे जीवनास अर्थ ।
तुझ्याच कृपेने जीवन होऊ दे कृतार्थ ॥ ३ ॥

काय मागणे मागावे तुजला ।
न मागता मिळतसे मजला ।
आस असे तुझ्या प्राप्तीची ॥ ४ ॥

ध्यास असो तुझ्या चरणांचा मम हृदयी ।
सर्वस्व अर्पू दे तुझ्या चरणी ।
हेचि मागणे आज तुजला ॥ ५ ॥

- सौ. सारिका आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn