Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गणेश यागाच्या कालावधीत आलेल्या अनुभूती

     ‘४ ते ६.१०.२०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात गणेश याग झाला. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
१. यज्ञस्थळी ‘प्रत्यक्ष श्री गणेश उपस्थित आहे’, असे वाटणे
    ‘यज्ञस्थळी बसल्यावर ‘माझ्याभोवती संरक्षक कवच निर्माण होत आहे’, असे जाणवत होते. ‘प्रत्यक्ष श्री गणेश तेथे उपस्थित आहे’, असे वाटून माझी भावजागृती होत होती. यज्ञस्थळी नामजप करतांना मला पुष्कळ शांत वाटत होते आणि आनंद मिळत होता.
२. ‘साधक-पुरोहितांऐवजी देवताच पठण करत आहेत’, असे वाटणे
आणि यज्ञस्थळी अनेक देवता पुष्पवृष्टी करत असल्याचे दिसणे
    ‘यज्ञस्थळी साधक-पुरोहित पठण करत नसून सर्व देवताच पठण करत आहेत’, असे वाटून माझी पुष्कळ भावजागृती होत होती. तसेच ‘यज्ञस्थळी अनेक देवता उपस्थित असून त्या पुष्पवृष्टी करत आहेत’, असे दिसत होते.
३. यज्ञाच्या ज्वाळांत अग्निदेवतेचे दर्शन होणे
     यज्ञाच्या ज्वाळांत मला अग्निदेवतेचे दर्शन झाले. यज्ञाचा धूर संपूर्ण आश्रमात पसरल्यामुळे ‘देव सर्वत्र चैतन्य पसरवत आहे’, असे वाटत होते. यज्ञाच्या ठिकाणी मला पुष्कळ थंडावा जाणवत होता.
४. यज्ञाच्या कालावधीत आश्रम परिसरात गाय, कुत्रा आणि
भारद्वाज येणे अन् ते यज्ञातील चैतन्याचा लाभ घेण्यासाठी आल्याचे जाणवणे
     यज्ञाच्या कालावधीत आश्रम परिसरात गाय, कुत्रा हेे प्राणी आणि भारद्वाज पक्षी आला होता. ‘तेही यज्ञातील चैतन्याचा लाभ घेण्यासाठी आले आहेत’, असे जाणवले. आश्रम आणि आश्रम परिसरात देव अनेक दैवी संकेत देत होता. त्यामुळे माझे साधनेचे प्रयत्न होऊन सेवेमध्येही पुष्कळ उत्साह जाणवत होता.’
गुरुदेवा, केवळ तुमचीच लहान बालिका
- कु. योगिनी वैभव आफळे (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn