Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे), आम्हीदेखील भक्त असल्याने देवाच्या दरबारी महिलांचे अस्तित्व नाकारू नका !

धर्माचे नियम पायदळी तुडवणार्‍या तृप्ती देसाईंचा कांगावा
    मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) - आम्ही कोणत्याही परंपरेला ठेच पोचवलेली नाही. आमची लढाई धर्मातील चुकीच्या रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात आहे. याआधीही सतीसारख्या चुकीच्या प्रथा बंद करून विधवा पुनर्विवाहाला मान्यता देण्यात आली. २१ व्या शतकात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात असतांना तुम्ही त्यांना अपवित्र ठरवत आहात, हे चुकीचे आहे. ज्या आईच्या उदरातून देवाने जन्म घेतला त्यांचे प्रतिनिधीत्व आम्ही करत आहोत. आम्हीदेखील भक्त असल्याने देवाच्या दरबारी महिलांचे अस्तित्व नाकारू नका, असे (कु) विचार भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले. ३ डिसेंबर या दिवशी तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यामध्ये मजारपर्यंत जाऊन चादर चढवली. (देवता म्हणजे व्यक्ती नसून तत्त्व आहे, हेही न जाणणार्‍या तृप्ती देसाई म्हणे देवाच्या भक्त आहेत ! - संपादक)
तृप्ती देसाई यांचा अट्टाहास आणि कावेबाजपणा !
     हाजी अली दर्ग्यामध्ये दर्शनाला जाण्यासाठी महिला आणि पुरुष यांच्या २ रांगा आहेत; मात्र तृप्ती देसाई यांनी पुरुषांच्या रांगेतून जाण्याचा अट्टाहास केला; मात्र पोलिसांनी त्यांना महिलांच्या रांगेतूनच आत जाण्यास भाग पाडले. दर्ग्यातून बाहेर पडल्यावर या घटनेविषयी सांगतांना त्या म्हणाल्या, आतमध्ये मला धक्काबुक्की करण्यात आली. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नव्हते.
तृप्ती देसाई यांचे पुढचे धर्मद्रोही पाऊल !
शबरीमाला मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी आंदोलन करणार !
    या वेळी पत्रकारांशी बोलतांना तृप्ती देसाई यांनी केरळमधील शबरीमाला मंदिरातील गर्भगृहापर्यंत महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी केरळ येथे जानेवारी मासात (महिन्यात) भूमाता ब्रिगेड आणि भूमाता रणरागिणी ब्रिगेड आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
    अचलपूर येथे घटनेविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना तृप्ती देसाई म्हणाल्या, अचलपूर येथे भोंदूबाबाच्या विरोधात पोलिसांनी तातडीने गुन्हा प्रविष्ट  करावा. पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला नाही, तर भोंदूबाबाला चोप देऊ.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn