Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणिधर्म यांच्या रक्षणासाठी सतत दिव्य प्रवास करणार्‍यासनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

वाचा आजपासून प्रतिदिन नवीन सदर 
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्राचे सर्व नैसर्गिक आपत्तींपासून आणि परकीय आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळावा, धर्माचे तसेच साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम आणि संशोधन केंद्रे इत्यादींना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत. अशा प्रकारे त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, तसेच महर्षि सांगत असलेल्या दैवी प्रवासाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी आजपासून प्रतिदिन हे सदर चालू करत आहोत.
२.१२.२०१६
साधकांना कालसर्पयोगाचा त्रास होऊ नये, यासाठी महर्षींनी सांगितलेला उपाय :
साधकांना कालसर्पयोगाचा त्रास होऊ नये, यासाठी २.१२.२०१६ या दिवशी महर्षींनी आम्हाला तमिळनाडू राज्यातील ईरोड येथील श्रीविष्णूच्या कस्तुरीरंगनाथन् या देवळात, तसेच त्याच्या बाजूला असलेल्या शिवाच्या देवळात दर्शन घेऊन तेथील देवांना साधकांसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. (त्या स्थानी दुर्वास ऋषींनी तप केले आहे.) त्याप्रमाणे आम्ही त्या दिवशी सायंकाळी ६ वाजता जाऊन साधकांना कालसर्पयोगाचा त्रास होऊ नये, यासाठी प्रार्थना केली आणि साधकांभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठीही प्रार्थना केली.
८.१२.२०१६
देहली सेवाकेंद्रामधील साधकांना होत असलेले वाईट शक्तींचे त्रास दूर होण्यासाठी महर्षींनी उपाय सांगणे : देहली सेवाकेंद्रामध्ये असलेल्या साधकांना लादीवर रक्ताचे डाग पडणे, साधकांना न सुचणे, दाब जाणवणे, त्यांची प्राणशक्ती न्यून होणे, असे त्रास गेले काही दिवस सातत्याने होत होते. या त्रासांवर महर्षींनी सांगितल्याप्रमाणे उपाय ८.१२.२०१६ या दिवशी करण्यात आला. हा उपाय पू. डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे या उपायांना संतांच्या चैतन्यदायी अस्तित्वाची जोड मिळाली.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (क्रमश:) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn