Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

माजी कृषिमंत्री शशिकांतभाऊ सुतार यांच्या हस्ते समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांचा सत्कार

कोथरूड (जिल्हा पुणे) येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीचा गौरव !
सत्कार स्वीकारतांना समितीचे
श्री. कृष्णाजी पाटील (उजवीकडे)
      पुणे, ९ डिसेंबर (वार्ता.) - येथील शिवसमर्थ सभागृहात नुकतेच प्रभाग क्र. ११ मधील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शिवसेनचे माजी कृषिमंत्री श्री. शशिकांत भाऊ सुतार, शिवसेनेचे पुणे शहर संघटक सर्वश्री श्याम देशपांडे, कार्यक्रमाचे आयोजक जयदीप पडवळ, कोथरूड विभाग शिवसेना प्रमुख राजेश पळसकर, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव भिलारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही या मेळाव्याचे आमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. शशिकांतभाऊ सुतार यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
     या प्रसंगी श्री. श्याम देशपांडे यांनी हिंदु जनजागृती समिती, तसेच सनातन संस्था यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्य पुष्कळ चांगले आहे. समिती आणि शिवसेना यांनी हिंदूंसाठी एकत्रितपणे आतापर्यंत बरेच उपक्रम राबवले आहेत. सनातनच्या कार्याला आमचा नेहमीच पाठिंबा असतो आणि नेहमीच राहील.’’ या वेळी श्री. कृष्णाजी पाटील यांनी त्यांच्या मनोगतात ‘शिवसेना हा हिंदुत्वासाठी लढणारा एकमेव राजकीय पक्ष आहे. त्यामुळे हिंदूंना नेहमीच शिवसैनिकांचा आधार वाटतो’ अशी भावना व्यक्त केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn