Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची निधी संपवण्याच्या मुदतीत ८ दिवसांची वाढ करण्याची मागणी !

       मुंबई - नगरसेवकांना दिला जाणारा निधी संपवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेली मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी सभागृहात केली. राज्य निवडणूक आयोगाच्या बंधनानुसार मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाल ७ मार्च या दिवशी संपत असल्याने ७ डिसेंबरपासून नगरसेवक निधी वापरण्यास बंदी घालण्याचे परिपत्रक पालिका आयुक्तांनी काढले आहे. या मर्यादेमुळे कामे रखडली असून नगरसेवकांची कोंडी करण्याचा हा डाव आहे. ही अघोषित आचारसंहिताच आहे, असे नगरसेवकांनी म्हटले आहे. महानगरपालिकेतील संगणकीय बिघाडामुळे विकासकामांचे आदेश निघू शकले नाहीत.
       मुंबई महानगरपालिकेत ६० लाख रुपये नगरसेवक निधी दिला जातो. अनेक नगरसेवकांचा निधी शेष आहे. प्रभाग समितीमध्ये संमत झालेल्या कामांना तरी अनुमती द्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक याकूब मेनन यांनी केली. या सूत्राला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. २६ ऑक्टोबरला गटनेत्यांच्या बैठकीत या परिपत्रकाविषयी सांगण्यात आले; मात्र नगरसेवकांपर्यंत हे परिपत्रक पोचले नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले. सभागृहनेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी ही मुदत ८ दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी केली असून प्रशासनाने या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पाठपुरावा घ्यावा, तसेच २२ डिसेंबरला याविषयी सविस्तर माहिती सादर करावी, असे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn