Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज (तिथीनुसार) शिवप्रतापदिन, करूया शिवरायांना वंदन !

    ‘काही शतकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी अफझलखानाचा वध केला होता. छत्रपतींच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ ही तिथी ‘शिवप्रतापदिन’ म्हणून ओळखली जाते. या वर्षी ही तिथी ६.१२.२०१६ या दिवशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ही काव्यसुमनांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करूया.
  देवाचे घेऊनी दर्शन, करूया पराक्रमाचे स्मरण ।
 आज शिवप्रतापदिन, करूया शिवरायांना वंदन ॥ १ ॥

 महादेवाचे लाभले वरदान अन् भवानीमातेचे कृपादान ।
 जिजाऊंचे सुपुत्र गुणवान, परम प्रतापी चारित्र्यवान ॥ २ ॥
समर्थांचे शिष्य महान, करिती साधू-संतांचा सन्मान । प्रजा असे पुत्रासमान, राजा भासे देवासमान ॥ ३ ॥ 

संतांच्या आशीर्वादाने, भवानीदेवीच्या तलवारीने ।
शिवशंभूच्या कृपेने, स्वराज्य स्थापले शिवरायाने ॥ ४ ॥

मराठ्यांशी झुंजले पठाण, कापले पातशाही निशाण ।
शत्रूची उडाली दाणादाण, शत्रूने गमावले प्राण ॥ ५ ॥

मराठ्यांनी जिंकले रणांगण, आदिलशाही झाली हैराण ।
स्वराज्याचे बांधले तोरण, फडकवले भगवे निशाण ॥ ६ ॥

पैजेचा विडा कोण जिंकणार ? अग्नी कोण भक्षण करणार ? ।
कोण विषाची परीक्षा घेणार ? वाघाशी कोण झुंज देणार ?॥ ७ ॥ 

अफझल निघाला जिहादासाठी, वाघाशी झुंजण्यासाठी ।
काफिरांना मारण्यासाठी, पैजेचा विडा जिंकण्यासाठी ॥ ८ ॥ 

धूर्त, लबाड अन् बेईमान, करी कपट कारस्थान ।
यावनी राक्षस सैतान, क्रूर अफझलखान ॥ ९ ॥

हत्ती, घोडे सैन्य बलवान, स्वराज्यात घुसला खान ।
राक्षसाने घातले थैमान, मायभूचे केले स्मशान ॥ १० ॥ 

देवांच्या मूर्ती फोडून, मूर्तींच्या ठिकर्‍या करून ।
मंदिरांचा विध्वंस करून, स्वराज्य गेले होरपळून ॥ ११ ॥

स्वराज्य करण्या भक्षण, खानाने केले आक्रमण ।
स्वराज्याला लागले ग्रहण, कोण करील स्वराज्याचे रक्षण ? ॥ १२ ॥ 

हिंदूंचे रक्त सांडले, पायदळी देव तुडवले ।
स्वराज्याला राहूने ग्रासले, कुठे गेले शिवाजी भोसले ॥ १३ ॥ 

जावळीचे जंगल घनदाट, सूर्यकिरणही शोधती वाट ।
चिरेबंद प्रताप गडकोट, सह्याद्रीचा शिरपेच मुकूट ॥ १४ ॥

जावळीत खान उतरला, वाईत मुक्काम ठोकला ।
स्वराज्याच्या उरावर बसला अन् खानाने सापळा रचला ॥ १५ ॥

शिवाजीकडे वकील पाठवला, खलीताही संगे दिला ।
मैत्रीचा हात पुढे केला, म्हणे झालो आतुर तुझ्या भेटीला ॥ १६ ॥

शिवाजी अवश्य भेटतील, तुमची मैत्रीही स्वीकारतील ।
वदले पंताजी बोकील, शिवरायांचे विश्‍वासू वकील ॥ १७ ॥

प्रतापगडाच्या पायथ्याशी, या मोजक्या सैन्यानिशी ।
भेट होईल शिवाजीशी, सह्याद्रीच्या सिंहाशी ॥ १८ ॥

अंगावर चिलखत चढवूनी, मस्तकावर शिरस्त्राण घालूनी ।
बोटांत वाघनखे लपवूनी, शिवाजीराजे आले गड उतरूनी ॥ १९ ॥

देव-असुर समोरासमोर आले, शिवाजी खानाला भेटले ।
खानाने नाटक केले, मैत्रीने शिवाजीस कवटाळले ॥ २० ॥

खानाने दगा केला, पाठीत खंजीर खुपसला ।
शिवाजीवर वार केला; पण एक चमत्कार घडला ॥ २१ ॥

उग्र रूप धारण केले, शिवबात नृसिंह प्रगटले ।
वाघनखांनी वार केले, खानाचे पोट फाडले ॥ २२ ॥

खानाचा कट उधळला, खान प्राणाला मुकला ।
खानाला धडा शिकवला, शिवबाने खान संपवला ॥ २३ ॥

चवताळून केला वार, सय्यदने शिवबांवर ।
जिवा महालाने रोखूनी वार, प्राण वाचले एक वार ॥ २४ ॥

स्वराज्याचे ग्रहण सुटले, मोठे संकट टळले ।
नृसिंहाने युद्ध जिंकले, शिवबा सुखरूप परतले ॥ २५ ॥

प्रभु श्रीरामचंद्राने रावणाचा वध केला,
भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी कंस संपवला ।

शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला,
ऐसा पराक्रमी इतिहास केवळ भारतातच घडला ॥ २६ ॥

श्रीकृष्णाचा अंश असलेली,
कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२६.११.२०१४)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn