Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

केरळच्या ख्रिस्ती शाळेत मुलांना हिंदुविरोधी शिकवण देत असल्याचा पालकांचा आरोप !

ख्रिस्ती शाळांमध्ये आपल्या मुलांना हिंदुविरोधी शिकवण देऊन
त्यांचे वैचारिक धर्मांतर तर करण्यात येत नाही ना, याविषयी हिंदूंनी जागरूक राहिले पाहिजे !
    एर्नाकुलम् (केरळ) - परावूरमध्ये एका ख्रिस्ती शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हिंदुविरोधी भावना निर्माण करून ख्रिस्ती धर्माविषयी आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त झाला असून त्यांनी शाळा हिंदुविरोधी कार्यक्रम राबत असल्याचा आरोप केला. त्यानंतर शाळेच्या शिक्षिकेने व्यवस्थापनाच्या वतीने क्षमा मागितली आहे.     राज्याच्या दक्षिण आलंगदमधील या शाळेत बालवाडीच्या मुलांना एक कॉमिक्स वाटण्यात आले. मल्याळम् भाषेतील या कॉमिक्समध्ये दिले आहे की, एक गरीब हिंदु व्यक्ती अनेक मंदिरांमध्ये नवस मागते; पण तिच्या पदरी निराशा येते. ती चर्चमध्ये गेल्यावर येशूला प्रार्थना करते, तेव्हा तिच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळते आणि तिला पुष्कळ लाभ होतो. तेव्हापासून ती व्यक्ती मंदिरांमध्ये जाण्याचे सोडून देते. यावर हिंदु पालकांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते या शाळेत हिंदु धर्माला हीन दर्जा असल्याचे दाखवण्यात येत आहे. हे पुस्तक नोव्हेंबर मासात प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मशिदीत पूजा करत असतांनाचे चित्र छापण्यात आले आहे. हिंदूंच्या मते शाळेत हिंदु धर्मावर टीका करण्यात येत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn