Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परिपूर्ण सेवेचा ध्यास असणार्‍या आणि तरुणांना लाजवेल, अशी कार्यक्षमता असणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. क्षमा राणे (वय ६७ वर्षे) !

सौ. क्षमा राणे 
     रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. क्षमा राणे यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष त्रयोदशी १२.१२.२०१६ या दिवशी ६७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे पती आणि रामनाथी आश्रमातील साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि जाणवलेले पालट येथे देत आहोत. 
सौ. क्षमा राणे यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा ! 
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. श्री. शशिकांत राणे (सौ. क्षमा राणे यांचे पती
१ अ १. वेळ वाया जाऊ न देणे : ‘सौ. क्षमा आवश्यक तेवढीच विश्रांती घेते आणि उर्वरित वेळ नेमून दिलेली सेवा, टापटीपपणा, स्वच्छता आणि खोलीची निगा राखणे यांसाठी वापरते. हा तिचा नित्यक्रम असतो.
१ अ २. तरुणांना लाजवणारी कार्यक्षमता : प्रतिदिन सकाळी खोलीतील केर काढून, सर्व आवरून कपड्याने लादी पुसणे आणि रात्री उशिरापर्यंत सेवारत रहाणे, हा तिचा दिनक्रम तरुणांना लाजवणारा आहे. या दिनक्रमात ती अनेकांना साहाय्य करण्याचाही प्रयत्न करत असते.
१ अ ३. प्रचंड जिद्द : कोणतीही सेवा करतांना तिची ती परिपूर्ण करण्याची मानसिकता असते. त्या सेवेशी संबंधित सर्व पर्याय आणि सर्व सूत्रे खोलवर जाऊन पडताळणे, संशयाला जागा न सोडणे, ही तिची सेवा करण्याची पद्धत आहे. त्यात तिला नेहमी यशच येते.
१ अ ४. सेवा परिपूर्ण करण्यासाठी देह झिजवण्याची सिद्धता असणे आणि शारीरिक कष्टांची कधीच तक्रार न करणे : सेवा बिनचूक आणि परिपूर्ण व्हायला हवी, असा तिचा ध्यास असतो. तिची सेवा पूर्ण करण्यासाठी देह झिजवण्याची सिद्धता असते. त्यासाठी कितीही वेळ गेला, तरी पर्वा नसते. त्या वेळी तिचे तहान-भुकेकडे पूर्ण दुर्लक्ष होते. शारीरिक कष्टांची तिची कधीच तक्रार नसते.
१ अ ५. अन्य अनुकरणीय गुण : चुकीची खंत वाटणे आणि प्रलंबित गोष्टींचा पाठपुरावा करणे, हे तिचे गुणही अनुकरणीय आहेत. 
     प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे पत्नीची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये त्यांच्या चरणी अर्पण करत आहे. या व्यतिरीक्तही तिच्यामध्ये अनेक गुण आहेत.’ 
१ आ. सौ. प्राजक्ता जोशी
१ आ १. साधी रहाणी आणि व्यवस्थितपणा : काकू पूर्वी अधिकोषात उच्च पदावर कार्यरत असूनही त्या अतिशय साध्या रहातात. सेवेसाठी अधिक वेळ वापरता येण्यासाठी त्या साडी धुतल्यावर योग्य पद्धतीने वाळत घालतात. त्यानंतर साडीची व्यवस्थित घडी घालून ठेवतात. त्यामुळे त्यांनी साडी नेसल्यावर ती इस्त्री केल्याविना नेसली आहे, असे जाणवत नाही. त्या साडीही अशा पद्धतीने नेसतात की, त्यांची कितीही धावपळ असली किंवा त्या झोपून उठल्या, तरीही ती जशीच्या तशीच असते. 
१ आ २. उत्साही : काकू नेहमी उत्साही असतात. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत त्या उत्साहाने सेवेत असतात. त्यांना त्यांच्या सेवेअंतर्गत अनेक वेळा स्वागतकक्ष ते चौथा मजल्यापर्यंत ये-जा करावी लागते, तरीही त्या उत्साही दिसतात.
१ आ ३. साहाय्य करण्याची तळमळ : सौ. काकूंकडे कोणीही साहाय्य मागितल्यावर त्या व्यस्त असूनही ‘नाही’ न म्हणता त्यांच्यापरीने साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये पू. सौरभदादांना पुष्कळ उलट्या होत होत्या. उलटी होत असेल, तेव्हा पू. दादांना झोपलेल्या स्थितीत उलटी झाल्यास त्रास होऊ नये; म्हणून उचलून घ्यावे लागायचे. त्यांना उचलून घेतल्यामुळे माझ्या कपड्यांवर उलटी होत असे. ‘मला अतिरिक्त कपडे धुवायला लागू नये यासाठी काय करता येईल’, याचे काकूंनी चिंतन केले. त्यांनी धुतल्यावर लगेच सुकतील आणि वापरता येतील, असे त्यांच्या साडीचे दोन अंगफलक मला बनवून दिले आणि ‘शिवलेल्या अंगफलकाचा लाभ होतोय ना’, हे पाहिले. प्रत्यक्षात पू. सौरभदादांना उलटी आल्यासारखे झाल्यास अंगफलक घेण्यासही कालावधी मिळत नसे. त्यांना लगेच उचलावे लागत असे. उचलण्यास विलंब झाल्यास त्यांना उलटी होऊन नाक, कान आणि मानेखाली पसरली जायची. त्यांची ही स्थिती पाहून त्यांनी ‘अजून काय करता येईल’, याचा अभ्यास करायचे ठरवले.
१ आ ४. शिकण्याची वृत्ती : राणेकाकू वयाने मोठ्या असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. भ्रमणभाषमधील सुविधा शिकून तिचा सेवेसाठी वापर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 
    काकू नेहमी म्हणतात, ‘‘पू. दादा एकाच स्थितीत असूनही सतत इतके आनंदी असतात. त्यांच्यासारखे सतत आनंदी आणि ‘श्रीं’च्या (प.पू. डॉक्टरांच्या) अनुसंधनात रहाता आले पाहिजे.’’ ‘पू. सौरभदादांसारखे राणेकाकूंनाही आनंदात ठेवा’, अशी प.पू. गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.’
१ इ. श्री. संजय जोशी
१ इ १. इतरांना साहाय्य करणे : ‘गेल्या वर्षी आश्रमातील स्वयंपाकघराचे नूतनीकरण चालू होते. त्यामुळे दुसर्‍या मजल्यावरील स्वयंपाकघर काही कालावधीसाठी तळमजल्यावर नेण्यात आले होते. असे असतांना काही साधकांना सकाळी चहा आणि दूध देण्यासाठी त्या खाली तळमजल्यावरील स्वयंपाकघरात जाऊन त्यांना आणून देत असत. पू. सौरभदादा कधी कधी पहाटे उठायचे. तेव्हा मी त्यांना दूध आणण्यासाठी खाली जात असे. मला पहाताच त्या म्हणायच्या, ‘‘दादा, तुम्ही कशाला खाली येता. मला का नाही सांगत. पू. दादांना मी दूध आणून देत जाईन. तुम्हाला काहीही साहाय्य लागले, तर अवश्य सांगा.’’ 
१ इ २. सौ. राणेकाकू खोलीत आल्यावर त्यांना जाण्यास अनुमती न देणार्‍या पू. सौरभदादांनी पू. सखदेवआजींनी देहत्याग केला, त्या दिवशी काकूंना त्वरित जाण्यास सांगणे : त्या कधी कधी पू. सौरभदादांना भेटायला येतात. आल्यावर त्या पू. सौरभदादांची अत्यंत प्रेमाने चौकशी करतात. त्या आल्या की, पू. सौरभदादा त्यांना ‘आजी’ म्हणून हाक मारतात. त्यांच्याशी बोलण्याचाही पू. दादा प्रयत्न करत असतात. त्यांनी जायचे म्हटले की, पू. दादा त्यासाठी लगेच सिद्ध होत नाहीत. पू. दादांना अनेक वेळा सांगितल्यावर ते त्यांना जाण्याची अनुमती देतात. 
     पू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केला, त्या दिवशी सौ. प्राजक्ता जोशी यांच्याशी बोलण्यासाठी सौ. राणेकाकू पू. सौरभदादांच्या खोलीत आल्या होत्या. त्यांचे बोलणे झाल्यावर पू. सौरभदादांनी लगेच त्यांना ‘टाटा’, ‘टाटा’, असे म्हणण्यास प्रारंभ केला. त्या वेळी मी पू. सौरभदादांना विचारले, ‘‘त्यांना तुम्ही जायला सांगत आहात का ?’’ त्या वेळी पू. सौरभदादा ‘हो’ म्हणाले. 
    पू. सौरभदादांनी असे का करत आहेत, याविषयी सौ. राणेकाकूंशी बोलल्यावर समजले की, पू. सखदेवआजींच्या उत्तरविधींसाठी त्यांना खाली जायचे होते. त्यानंतर त्या लगेच खाली गेल्या. यावरून ‘पू. सौरभदादांनीही त्यांची सेवेतील तातडी ओळखली होती’, याची जाणीव झाली.
२. जाणवलेला पालट 
२ अ. प्रत्येक प्रसंगात स्वत:चे मत मांडण्याचा भाग थांबणे 
     प्रत्येक गोष्टीवर स्वतःचे मत मांडण्याची तिची वृत्ती होती. कुठलीही गोष्ट ऐकली की, त्यावर चटकन् काहीतरी बोलायची. त्यात ती गोष्ट करतांना येऊ शकणारे अडथळे ती बोलून दाखवायची. मागील दोन मासांपासून (महिन्यांपासून) तिचा हा दोष पूर्णतः निघून गेलेला दिसतो. काहीतरी सांगितल्यावर त्यावर लगेच स्वत:चे मत मांडणे थांबल्याचे जाणवले.’ - श्री. शशिकांत राणे (सौ. क्षमा राणे यांचे पती) (१६.११.२०१६) 
२ आ. ईश्‍वरेच्छेने वागण्याचा प्रयत्न करणे
     ‘पूर्वी काकू प्रत्येक प्रसंगात स्वत:ला काय करता येईल एवढेच पहायच्या; परंतु आता पू. सौरभदादा, इतर संत अथवा साधकांना त्रास होत असतांना प.पू. डॉक्टरांना प्रार्थना करतात, ‘तुम्हीच मला या प्रसंगात काय करू, हे शिकवा.’ एखादा प्रतिकूल प्रसंग झाला की, काकू मोठ्या असूनही ‘माझे काय चुकले ?’ याचा विचार करतात. त्या म्हणतात, ‘‘देवाला मला यातून अजून काहीतरी शिकवायचे आहे. परिपूर्ण करायचे आहे. प.पू. डॉक्टरच मला यातून बाहेर काढतील. तेच माझी काळजी घेतील.’’
२ इ. पूर्वीपेक्षा स्थिरता जाणवणे 
     काकूंनी दोन वर्षांपूर्वी स्वत:च्या प्रगतीत ‘ज्योतिषशास्त्रानुसार काही अडथळे आहेत का ?’, हे विचारले होते. तेव्हा मी त्यांना व्यष्टी साधना होण्यासाठी दोन घंटे नामजप करण्यास सुचवले होते. तेव्हापासून काकू न चुकता पहाटे लवकर उठून दोन घंटे जप करतात. आता त्या पूर्वीच्या तुलनेत स्थिर झाल्या आहेत. 
२ ई. अपेक्षा अल्प होणे 
     काकूंची प्रत्येक कृती व्यवस्थित असते. स्वयंपाकघर, बेकरी, शिवण सेवा अशा कोणत्याही ठिकाणी सेवा झाल्यावर स्वच्छता त्या करतात. पूर्वी एखादी सेवा झाल्यावर आवरतांना सहसाधकांनी स्वच्छता करावी, अशी त्यांची अपेक्षा असायची. आता त्या स्वतःच करतात.’
- सौ. प्राजक्ता जोशी (२२.११.२०१६)
२ उ. क्षमाशील 
     ‘काकू त्यांच्यापेक्षा लहान मोठ्या सर्वांनाच उदार अंत:करणाने नेहमी क्षमा करतात. त्यांच्या मनात कोणाविषयीही पूर्वग्रह नसतात.’ 
- सौ. सारिका आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn