Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१७.१२.२०१६ - चेन्नई, तमिळनाडू
१. महर्षींनी नाडीवाचनात साधकांना आपत्काळाची जाणीव करून देणे
     १७.१२.२०१६ या दिवशी दुपारी १२ वाजता केलेल्या नाडीवाचनात महर्षींनी सतत आपत्काळाचा उल्लेख करून साधकांना त्याची जाणीव करून दिली. त्यांच्यात आपत्काळाचे गांभीर्य येण्यासाठी त्यांना सांगितले, साधकांनी परम गुरुजींवर श्रद्धा वाढवली नाही आणि जर या आपत्काळामुळे त्यांना काही हानी पोचली, तर त्यांनी रक्षण न झाल्याबद्दल महर्षींना दोष देऊ नये.
२. महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ यांना साधकांच्या रक्षणासाठी परिहार (उपाय) सांगणे आणि त्याचे कारणही सांगणे
     महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि मी आम्हा तिघांना साधकांच्या रक्षणासाठी परिहार (उपाय) सांगितला आहे. ते म्हणाले, आता काळ भयानक आहे. या तिघांनी परिहार केल्यामुळे देव साधकांकडे बघेल आणि साधकांचे रक्षण होईल. आम्हा प्रत्येकाला आपापल्या वयाप्रमाणे तेवढ्या संख्येने तिळाच्या तेलाचे दिवे प्रत्येक अमावास्येला लावायला सांगितले आहेत, उदा. माझे वय ४७ आहे, तर मी ४७ दिवे लावायचे. हे दिवे लावून त्यांच्या ज्योतींना प्रार्थना केल्यामुळे साधकांचे अग्नीपासून रक्षण होईल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn