Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवाच्या ओढीमुळे स्वभावदोष आणि अहं यांवर मात करून स्वतःत पालट घडवणे शक्य असल्याचे उदाहरण म्हणजे रामनाथी आश्रमातील साधक श्री. राकेश पाध्ये !

श्री. राकेश पाध्ये
१. आश्रमजीवनाचा अनुभव नसल्याने प्रारंभी 
श्री. राकेश आणि कुटुंबीय यांचा संघर्ष होणे आणि स्वतःचा 
संघर्ष होत असतांनाही त्यांनी पत्नीला साधनेविषयी योग्य दृष्टीकोन देणे
     ‘श्री. राकेशदादा (श्री. राकेश पाध्ये) साधारण दीड ते दोन वर्षांपूर्वी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले. त्या वेळी त्यांना आश्रमातील सर्व कार्यपद्धती माहिती नसल्याने आणि आश्रमजीवनाचा अनुभव नसल्याने प्रारंभी त्यांचा थोडा संघर्ष होत असे. त्यांचा मुलगा चि. वल्लभ आणि पत्नी सौ. पूर्वा यांनाही आश्रमजीवन, आश्रमातील कार्यपद्धती ठाऊक नसल्याने थोडे कठीण जायचे. त्यामुळे राकेशदादांना ‘हे सर्व कसे हाताळायचे ?’, असा थोडा ताण असायचा. त्या वेळी त्यांनाही इतरांकडून काही प्रमाणात अपेक्षा असायच्या. या परिस्थितीत ते स्वतः नवीन असूनही ते पूर्वाताईला ‘आपण प्रत्येक ठिकाणी साधना म्हणून कसे पहायला हवे ?’, ते सांगायचे. ताईला साधनेचा फारसा भाग ठाऊक नसल्याने तिचाही थोडा संघर्ष व्हायचा.
२. श्री. राकेश पाध्ये यांच्या कुटुंबियांत जाणवलेले पालट 
२ अ. मुलगा चि. वल्लभ चीडचीड न करता आनंदी रहाणे आणि सर्व साधकांमध्ये मिसळू लागणे : या काही दिवसांत श्री. राकेशदादा, सौ. पूर्वाताई आणि चि. वल्लभ यांच्यात पुष्कळ पालट दिसून आले. पूर्वी चि. वल्लभ आश्रमात आल्यावर आरंभी पुष्कळ चिडचीड करायचा. जेवतांना आईला पुष्कळ त्रास द्यायचा आणि रडायचा. त्यामुळे पूर्वाताईलाही त्याला सांभाळणे कठीण व्हायचे आणि तिचा संघर्ष व्हायचा. आता वल्लभ पुष्कळ आनंदी दिसतो. आता तो कधी चीडचीड करतांना, रडतांना किंवा हट्टीपणा करतांना दिसत नाही. आधी तो आश्रमातील साधकांशी बोलायचा नाही; पण आता तो सर्वांशी बोलतो. 
२ आ. आता ‘पूर्वाताईनेही स्वतःमध्ये पालट करण्यास आरंभ केला आहे’, असे अनुभवायला मिळाले. 
२ इ. श्री. राकेश यांचा साधकांकडून असलेल्या अपेक्षा आणि कौटुंबिक अडचणी यांमुळे होणारा संघर्ष अल्प होणे अन त्यांनी सेवा अभ्यासपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे : राकेशदादा बांधकामाच्या सेवेत असतात. या सेवेत दादा नवीन होते, तेव्हा त्यांच्याशी बोलणे व्हायचे. त्या वेळी काही वेळा ‘त्यांना अन्य साधकांकडून अपेक्षा आहेत’, असे लक्षात यायचे. काही कौटुंबिक अडचणी असल्यास दादांचा थोडा संघर्ष व्हायचा; परंतु दादांमध्ये या काही दिवसांमध्ये पुष्कळ पालट झालेला दिसतो. आता राकेशदादा समोरील साधकांचे पूर्ण सूत्र व्यवस्थित ऐकून घेतात. आश्रमातील बांधकाम सेवेअंतर्गत सर्व सूत्रांंचा छान अभ्यास करून ती सोडवतात. 
२ ई. दिवसभरात घडणार्‍या प्रसंगांकडे शिकण्याच्या आणि साधनेच्या दृष्टीने पाहिल्याने दादांना त्या त्या प्रसंगांतून योग्य ते शिकता येणे : भगवंताने राकेशदादांची शिकण्याची वृत्ती शिकण्याची संधी दिलेले एक उदाहरण सांगते. देवद आश्रमातून रामनाथी आश्रमात एक वस्तू आणायची होती. ‘ती वस्तू आणायची कि नाही ?’ हे रामनाथी आश्रमातील एक साधिका देवद आश्रमात कळवणार होती; परंतु ती ते कळवायचे विसरली. तसेच देवद आश्रमातील एका साधकाने ‘ती वस्तू पाठवायची आहे कि नाही ?’ याची खात्री न करताच ती वस्तू पाठवली. या दोघांमधे समन्वयाची सेवा राकेशदादांकडे होती. राकेशदादांनी याविषयी रामनाथी आश्रमातील साधिकेला विचारले असता तिने सांगितले, ‘‘दादा, माझी चूक झाली आहे. मी वस्तूविषयी तिकडे लवकर कळवले नाही. त्यामुळे त्यांनी वस्तू पाठवली.’’ तसेच देवद आश्रमातील साधकाला याविषयी विचारले असता त्यानेही स्वत:ची चूक सांगितली की, मी खात्री न करताच ती वस्तू पाठवली. रात्री जेवतांना हा प्रसंग राकेशदादा मला सांगत होते. तेव्हा त्यांनी मला याविषयी सांगितले, ‘‘ताई, दोन्ही साधकांमध्ये साधकत्व आहे.’’ (हे दोन्ही साधक ६० प्रतिशत आध्यात्मिक स्तर असणारे होते.) यामधे देवाने मला असे शिकवले, ‘साधकत्व अंगी असलेलेे साधक दुसर्‍याच्या चुकीकडे न पहाता ‘माझी यामधे काय चूक आहे ?’ याकडे पहातो.’ दोघांनाही चूक सांगण्यापूर्वीच त्यांनी स्वतःहून आपली चूक स्वीकारली. अंगी साधकत्व नसणारे साधक ‘अरे, मी निरोप दिला होता, मी त्यांना स्पष्ट केले होते’, असे लगेच सांगतात. या प्रसंगात देवाने साधकत्वाचे महत्त्व माझ्या लक्षात आणून दिले. 
     यातून मला असे वाटले, ‘दिवसभरात असे अनेक प्रसंग घडत असतात; परंतु राकेशदादांचा साधनेच्या अंगाने साधकांकडून योग्य शिकण्याचा भाग चांगला आहे. नाहीतर ते समन्वयक असल्याने त्यांनाही त्या दोघांचे दोषच दिसले असते; परंतु ते शिकण्याच्या आणि साधनेच्या दृष्टीने पहात असल्याने भगवंतानेही त्यांना योग्य ते शिकवले.’ 
     ‘ईश्‍वरप्राप्तीकरता आलेल्या प्रत्येक जिवात कितीही दोष-अहं असले, तरी मनामधील देवाच्या ओढीमुळे भगवंत त्याच्यामधे कसे पालट घडवून आणतो’, हे राकेशदादांच्या उदाहरणावरून मला शिकायला मिळाले. 
     ‘हे भगवंता, तू माझ्या आजूबाजूला अशी सर्व अनमोल साधकरत्ने ठेवली आहेस. त्यांचे महत्त्व माझ्या लक्षात येऊन मलाही त्यांच्याकडून असेच शिकता येऊ दे’, अशी आर्ततेने प्रार्थना !’ 
- सौ. कीर्ती जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२६.९.२०१६)
देवीची ओटी भरून शेष राहिलेल्या तांदुळांना आपोआप ‘ॐ’चा आकार प्राप्त होणे
     ‘२१.३.२०१६ या दिवशी भू (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील आमच्या घरी शेजारच्या गावातील देवीची पालखी आली होती. त्या वेळी मी देवीच्या पालखीच्या पायांवर (खुरांवर) दूध-पाणी घालून देवीची पूजा केली. नंतर मी ओटी भरण्याचे साहित्य पालखीच्या समवेत आलेल्या गुरवांकडे (पुजार्‍यांकडे) दिले. त्यांनी देवीची ओटी भरून तिला दोन्ही हातांच्या आेंजळीने तीन वेळा तांदूळ अर्पण केले. तेव्हा पूर्वी ओटी ठेवलेल्या ताटात शेष राहिलेल्या तांदुळांना आपोआप ‘ॐ’चा आकार प्राप्त झाल्याचे आमच्या काही वेळाने लक्षात आले.’
- श्री. राकेश पाध्ये, भू, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी (२१.३.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn