Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रेल्वेच्या १२ सहस्र तिकीट खिडक्या ‘कॅशलेस’ करण्यात येणार !

भारताची कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल ! 
     नवी देहली - ‘कॅशलेस’ (रोखविरहित) अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या ६ मासांत रेल्वेचे १२ सहस्र तिकिट खिडक्या ‘कॅशलेस’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे रोख रक्कमेद्वारे कोणतेही तिकीट मिळणार नाही. त्यासाठी रेल्वे प्रवाशांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा लागणार आहे. रेल्वे विभागाने यासाठी ‘आयसीआयसीआय’सह अन्य बँकांशी करार केले आहेत. या बँकांना तिकीट खिडक्यांसाठी १५ सहस्र ‘पीओएस्’ यंत्रे उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. प्राधान्याने सर्व शहरी भागात यंत्रे उपलब्ध करण्यात येणार आहे. रेल्वेच्या या कॅशलेस व्यवस्थेमुळे रेल्वे कर्मचार्‍यांना मोठ्या रोख रकमेपासून दिलासा मिळणार आहे, तसेच त्यांची चिल्लर पैशांची अडचण दूर होणार आहे. 

‘ऑनलाईन’ रेल्वे तिकिटांवरील सेवा शुल्क ३१ डिसेंबरपासून बंद होणार ! 
     ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून मिळणार्‍या ‘ऑनलाईन’ रेल्वे तिकिटांवरील सेवा शुल्क ३१ डिसेंबरपासून बंद होणार आहे. मंत्रालयाने या संदर्भातील प्रस्ताव सिद्ध केला आहे. सध्या ‘ऑनलाईन’ वातानूकुलित तिकिटांच्या नोंदणीसाठी ४० रुपये आणि सामान्य आरक्षित तिकिटांसाठी २० रुपये घेण्यात येतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn