Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दत्ताचा नामजप करतांना आलेल्या अनुभूती

१. श्रीमती जेनी, अमेरिका 
१ अ. स्वप्नात साधू नामजप करत असल्याचे दिसणे : ‘सत्संगाच्या दिवशी पहाटे ५ ते ६ या कालावधीत पडलेल्या स्वप्नात मला ख्रिस्ती धर्मोपदेशक नामजप करत असल्याचे दिसले. त्यानंतर मी झोपेतून उठले आणि ‘ईश्‍वराने मला शक्ती दिली आहे’, असे वाटून आनंद जाणवला. (मला बर्‍याच वेळा स्वप्नात लांब झगे घातलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक जप करत असतांना दिसतात.)
१ आ. दत्ताच्या नामजपात वाढ केल्यानंतर साप आणि कुत्री यांची स्वप्ने पडणे : मी ‘फोटोशॉप’ची सेवा करण्यास आरंभ केल्यानंतर आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप वाढवल्यानंतर मध्यरात्री साप आणि कुत्री यांची स्वप्ने पडतात. मी झोपेतून जागी होते आणि पुन्हा झोपते. झोपेतून उठल्यावरही साप चावल्याची संवेदना जाणवते.
१ इ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने केलेल्या मार्गदर्शनानुसार ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप २ ते ४ घंटे इतका वाढल्यावर स्वप्नांमध्ये होणारी नागांची आक्रमणे थांबणे आणि नाग काहीही करू शकत नसल्याचे लक्षात येणे : एका स्वप्नामध्ये नाग माझ्यावर आक्रमण करून हाताला चावत असल्याचे मला दिसले. एकदा मला कुत्रा चावल्याचे आणि तो मला अडवत असल्याचे स्वप्न पडले. पूर्वी मला नेहमी माझ्या कुटुंबातील सदस्यांची अंधःकारमय आणि खिन्न करणारी स्वप्ने पडत असत. ते आसुरी रूपात दिसत आणि हास्य करून मला भीती दाखवत. त्यामुळे मी घाबरून झोपेतून उठत असे. एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर आरंभी मी प्रतिदिन ३ - ४ घंटे देवतेचा नामजप आणि पूर्वजांच्या त्रासावर उपाय म्हणून ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप १५ ते २० मिनिटे करत होते. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने केलेल्या मार्गदर्शनानुसार मी नामजप प्रतिदिन २ ते ४ घंटे वाढवला. देवतेचा जप प्रतिदिन ६-७ घंटे करण्यास आरंभ केला. त्यामुळे स्वप्नात पालट झाले. काही दिवसांपूर्वी पडलेल्या स्वप्नामध्ये नाग माझ्याकडे येऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता; मात्र तो माघार घेऊन परत गेेला.’ (१५.६.२०१६) 
२. श्रीमती सँडी योंग, सिंगापूर 
२ अ. दत्ताचा नामजप करतांना घरात पुष्कळ सूक्ष्मदेह आल्याचे जाणवणे, भगवान बुद्ध प्रवचन करत असून सूक्ष्मदेहही प्रवचन ऐकत असल्याचे आणि काही लोक त्यांना नमस्कार करून गेल्याचे दिसणे : ‘मी आणि माझे कुटुंबीय एकत्रितपणे दत्ताचा नामजप करत असतांना मला ‘घरात (सूक्ष्मातून) पुष्कळ लोक आले आहेत आणि ते आमच्या भोवती उभे आहेत’, असे दिसले. नामजप चालू असतांना मला पुढील दृश्य दिसले. ‘भगवान बुद्ध प्रवचन करत असून घरात आलेले हे लोकही (सूक्ष्मदेहही) प्रवचन ऐकत आहेत. काही जण बुद्धांना साष्टांग नमस्कार करून निघून गेले. त्या वेळी मला माझ्या छातीच्या मागच्या बाजूवरील काळ्या चिकट आवरणाचा भाग निघून गेल्यासारखे वाटले. माझे डोके आणि आज्ञाचक्र येथे वेदना झाल्या. त्यानंतर अजून काही लोक बुद्धांना नमस्कार करून निघून गेले. 
२ आ. सूक्ष्मदेह नमस्कार करून गेल्यावर डोके आणि आज्ञाचक्र येथे हलकेपणा जाणवणे, आईचा सूक्ष्मदेह दिसून ती आनंदी नसल्याचे जाणवणे, तरीही आतून आनंद आणि शांती अनुभवणे, साधिकेचा दूरभाष आल्यावर खोली प्रकाशमान आणि शुद्ध झाल्याप्रमाणे वाटणे : ते गेल्यावर माझे डोके आणि आज्ञाचक्र येथे हलकेपणा जाणवला. शरिराच्या उजव्या बाजूला डोक्यापासून पायापर्यंतची हाडे मोडल्याप्रमाणे आवाज आला. माझी मृत आईही या लोकांत होती; पण ती आनंदी नव्हती. प्रवचन ऐकणे, साष्टांग नमस्कार करणे वा इतर कोणतीही कृती करायला ती अनुत्सुक असल्याचे जाणवले; मात्र मला आतून आनंद आणि शांती जाणवत होती. मला एका साधिकेचा दूरभाष आला आणि मी या स्थितीतून बाहेर आले. त्या वेळी मला खोली प्रकाशमान आणि शुद्ध झाल्याप्रमाणे वाटत होती. 
२ इ. नामजपानंतर माझ्या मुलीला आमच्या घरावर ‘आकाशातून सोनेरी कणांचा वर्षाव होत आहे’, असे दिसले.’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn