Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रुग्णालयात प्रकृती अस्वस्थ असतांनाही मृत्यूच्या दिवसापर्यंत साधनारत असणारे रंजन देसाईकाका !

१. आध्यात्मिक उपायांचे गांभीर्य 
     रुग्णालयात प्रकृती अत्यवस्थ असूनही देसाईकाका सतत प्रार्थना आणि नामजप करत होते. तसेच प.पू. पांडे महाराज यांनी दिलेला मंत्र वाचता येण्यासाठी त्यांनी तो मंत्र लिहिलेला कागद त्यांच्यासमोर पलंगाला लावून ठेवावयास सांगितला. 
२. सेवेची तळमळ
    देसाईकाका सतत सांगत होते, मला भ्रमणभाष दे. मला देवद आश्रमातील वाहनांची सेवा करणार्‍या साधकांशी बोलून सेवेविषयी प्रलंबित सूत्रे पूर्ण करायची आहेत आणि सेवांचे आढावे घ्यायचे आहेत. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना त्यांच्याकडील सेवेच्या दायित्वाची काळजी होती.
३. इतरांकडून सेवा होण्याविषयी तळमळ असणे 
अ. देसाईकाका सतत सांगायचे, केवळ व्यवहार बघू नकोस. साधना आणि सेवा कर. देव आपल्या व्यवहाराची काळजी घेईल. 
- श्री. राजेंद्र सामंत, पिंगुळी, कुडाळ. (देसाईकाका यांचे मेहुणे) 
आ. काका रुग्णालयात अतिदक्षता कक्षात असतांना त्यांनी मला आजच्या सेवेचे नियोजन काय आहे ?, असे विचारले आणि तू तुझ्या सेवेला जा. तुम्हा सर्व साधकांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत, असे सांगितले. - श्री. राजेंद्र परब, सनातन सेवाकेंद्र, कुडाळ, सिंधुदुर्ग. 
४. रुग्णालयात अस्वस्थता वाटूनही साधक-डॉक्टरांचे म्हणणे मान्य करणे
     देसाईकाका रुग्णालयात असतांना एके दिवशी त्यांनी जावयांना सांगितले, मला घरी न्या. इथे पुष्कळ अस्वस्थ वाटत आहे. त्या स्थितीत काकांना घरी घेऊन जाणे वैद्यकीयदृष्ट्या योग्य नव्हते. त्या वेळी डॉ. सामंत यांनी काकांना त्याविषयी समजावून सांगितल्यावर त्यांनी शांत आणि स्थिर राहून रुग्णालयात रहाणे मान्य केले. - श्री. राजेंद्र पाटील, सिंधुदुर्ग
५. प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धा
      देसाईकाकांशी औषधोपचारानिमित्त अनेक वेळा संपर्क होत असे. तेव्हा काका प.पू. गुरुदेव सांगतील, तेच मी करणार; कारण माझे जीवन-मरण हे त्यांच्या चरणांशी आहे, असे श्रद्धेने सांगत असत.
६. आध्यात्मिक प्रगतीविषयी पूर्वसूचना
     देसाईकाका अत्यवस्थ असल्याचे श्री. राजेंद्र पाटील यांनी मला सांगितले. तेव्हा लगेचच माझ्या मनात विचार आला, जर देसाईकाका गेले, तर त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे निश्‍चित घोषित होईल. - डॉ. नितीन ढवण, फोंडाघाट, कणकवली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn