Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

व्हेनेझुएलामधील नोटाबंदीचा निर्णय स्थगित !

      काराकस (व्हेनेझुएला) - भारताप्रमाणेच व्हेनेझुएलामध्ये १०० बोलीवरच्या नोटा बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता; मात्र त्याला लोकांकडून विरोध झाल्यामुळे तो निर्णय ७ दिवसांतच स्थगित करण्यात आला आहे. लोकांना नोटा पालटण्यासाठी १० दिवसांचा कालावधी सरकारने दिला होता. सरकारने म्हटले की, आर्थिक समस्यांमुळे नोटाबंदीचा निर्णय २ जानेवारी २०१७ पर्यंत स्थगित करण्यात येत आहे. १०० बोलीवर नोटांऐवजी ५०० आणि २० सहस्र बोलीवरच्या नोटा सरकारकडून आणण्यात आल्या होत्या; मात्र ५०० बोलीवरच्या नोटा पोचवण्यात सरकारला समस्या आल्याने हा निर्णय स्थगित करण्यात आला. नोटा पोचू नयेत, यासाठी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचण्यात आले, असा आरोप व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी केला आहे. नोटाबंदीनंतर येथे हिंसाचार आणि लुटमार चालू झाली होती. लोकांनी बाजारातील दुकाने आणि एटीएम् यंत्रे लुटले. तसेच नोटा घेऊन जाणारे वाहनही लुटण्यात आले. नोटा नसल्याने अनेक दुकाने बंद करण्यात आली. लोकांना जीवनावश्यक वस्तू न मिळाल्याने त्यांचा उद्रेक झाला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn