Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ईश्‍वरी ज्ञानाशी संबंधित सेवा करतांना प.पू. डॉक्टर आणि साधक यांना होणारा त्रास अन् ज्ञानसेवेचा सूक्ष्म-जगतावर होणारा परिणाम

श्री. राम होनप
      सनातनच्या ग्रंथांत पृथ्वीवर आतापर्यंत उपलब्ध नसलेले, तसेच बर्‍याच विषयांच्या संदर्भात का आणि कसे ? यासंदर्भातील उत्तरे देणारे बरेच ज्ञान असते. ज्ञान मिळण्याच्या प्रक्रियेसंदर्भात अनेकांना जिज्ञासा असते. ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेत प.पू. डॉक्टर आणि साधक यांना होणारे त्रास यासंदर्भातील ज्ञान येथे दिले आहे. 

१. प.पू. डॉक्टर आणि ईश्‍वरी ज्ञानप्राप्तकर्ते साधक यांचा 
आध्यात्मिक स्तर आणि त्यांना ज्ञानसेवेत होणार्‍या त्रासाचे प्रमाण 

 २. वाईट शक्तींनी ज्ञानसंपादनाचे कार्य थांबवण्यासाठी प्रथम प.पू. डॉक्टरांवर आक्रमण करणे; परंतु ते निष्प्रभ ठरल्याने वाईट शक्तींनी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांवर सूक्ष्मातून आक्रमण करणे आणि त्यांचे रक्षण प.पू. डॉक्टर करत असल्याने वाईट शक्ती परत त्यांच्यावर आक्रमण करत असल्याने प.पू. डॉक्टरांना ज्ञानसेवेत होणार्‍या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण अधिक असणे
     प.पू. डॉक्टरांच्या प्रेरणेने ज्ञान कार्य चालू असल्याचे वाईट शक्तींना ठाऊक असल्याने ते प्रथम प.पू. डॉक्टरांवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात. प.पू. डॉक्टरांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे वाईट शक्तींचे सूक्ष्मातून आक्रमण निष्प्रभ ठरते. त्यामुळे त्या चिडून ज्या साधकांना ईश्‍वरी ज्ञान मिळते त्यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमण करतात. अशा वेळी हे भगवंताचे कार्य असल्याने प.पू. डॉक्टरांच्या माध्यमातून भगवंत आणि दैवी शक्ती यांना संबंधित ज्ञान प्राप्तकर्त्या साधकांचे रक्षण करावे लागते. हे रक्षण केल्यामुळे वाईट शक्ती चिडून परत प.पू. डॉक्टरांवर सूक्ष्मातून आक्रमण करतात. त्यामुळे ज्ञान प्रक्रियेत प.पू. डॉक्टरांना आध्यात्मिक त्रास होतो. 

३. ज्ञानाच्या विषयानुरूप वाईट शक्ती करत असलेल्या आक्रमणाच्या तीव्रतेचे प्रमाण

 

४. ईश्‍वरी ज्ञानाद्वारे स्वतःचे अस्तित्व धोक्यात येऊ लागल्याने
       अनिष्ट शक्तींनी प.पू. डॉक्टर आणि ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांवर सूक्ष्मातून आक्रमण करणे
      वाईट शक्ती आणि दैवी घटनांचा अभ्यास, हे विषय मनुष्याला दीर्घकाळ लाभदायी ठरणारे आहेत. या विषयांमुळे वाईट शक्तींचे कार्य संपुष्टात येते. अशा वेळी त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने ते चिडून प.पू. डॉक्टर आणि ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांवर सूक्ष्मातून पूर्ण शक्तीनिशी आक्रमणे करतात. हा धोका वाईट शक्तींना ज्ञानाच्या संदर्भातील अन्य विषयांबाबत न वाटल्याने त्या अन्य विषयांच्या वेळी संबंधितांवर अल्प प्रमाणात आक्रमणे करतात.

५. सनातन संस्था करत असलेल्या ज्ञानकार्याला 
वाईट शक्तींचा विरोध मोठ्या प्रमाणात होण्याचे कारण
५ अ. युगानुरूप भगवंताने केलेल्या ज्ञानकार्याची वैशिष्ट्ये
५ अ १. सत्ययुग : सत्ययुगात बहुतेक जीव उपजतच ज्ञानी होती. त्यामुळे भगंवताला ज्ञानाद्वारे कार्य करण्याची आवश्यकता नव्हती.
५ अ २. त्रेतायुग : प्रभु श्रीरामाने स्वतःच्या आचरणाद्वारे समाजाला धर्माविषयी ज्ञान दिले, तसेच त्या काळच्या ऋषि-मुनींनी काही विषयांवर सखोल ज्ञानाचे कार्य केले.
५ अ ३. द्वापरयुग : भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून धर्म म्हणजे काय ? हे सांगितले, तसेच संत आणि ऋषि-मुनींनी काही विषयांवर आणखीन सखोल ईश्‍वरी ज्ञानाचे कार्य केले.
५ अ ४. कलियुग
५ अ ४ अ. कलियुगात प्रामुख्याने वाईट शक्तींच्या मोठ्या अडथळ्याचे ईश्‍वरी ज्ञानाद्वारे विश्‍लेषण केल्याने मनुष्य सावध होऊन ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गावर चालू लागणे : कलियुगाच्या आरंभापासून ते आतापर्यंत संत आणि ऋषि-मुनींनी काही विषयांवर सूक्ष्म आणि आणखीन सूक्ष्म स्वरूपाचे ज्ञान समाजासमोर आणले आणि भगवंत सध्या सनातन संस्थेच्या माध्यमांतून विविध विषयांवर सुलभ भाषेत अतिशय सूक्ष्म ज्ञानाचा अविष्कार करीत आहे. या अविष्कारात भगवंताच्या ज्ञानशक्तीचे आतापर्यंतचे हे सर्वाधिक प्रगटीकरण आहे. या विविध विषयांतील ज्ञानाच्या अनंत पैलूंनी भगवंताचे कार्य समाजाला हळूहळू समजल्याने त्याला धर्माचरणाची कृती, अनुभव आणि त्याद्वारे परमेश्‍वरप्राप्ती, हे टप्पे साध्य करता येतील; परंतु हे टप्पे साध्य करतांना कलियुगात प्रामुख्याने वाईट शक्तींचा मोठा अडथळा आहे. या अडथळ्यांचे विश्‍लेषण ईश्‍वरी ज्ञानाद्वारे केल्याने मनुष्य सावध होऊन ईश्‍वरीप्राप्तीच्या मार्गावर चालू लागतो.
५ अ ४ आ. सनातन संस्थेला मिळत असलेल्या ईश्‍वरी ज्ञानात ज्ञानशक्ती समवेत क्रियाशक्तीची जोड अधिक प्रमाणात असल्याने अनेक जीव साधनेला उद्युक्त होणे आणि असे होणे वाईट शक्तींना नको असल्याने त्यांनी ज्ञानकार्याला मोठ्या प्रमाणात विरोध करणे : त्रेता, द्वापर आणि मुख्य कलियुगापासून ते आतापर्यंत मिळालेल्या ईश्‍वरी ज्ञानात प्रामुख्याने भगवंताची ज्ञानशक्ती होती. ती शक्ती त्या त्या युगातील जिवांना साधनेला प्रेरणा देण्यास पुरेशी होती; परंतु सध्याच्या कलियुगातील छोट्या काळचक्रात समाजात साधना करण्याचे प्रमाण अल्प झाल्याने ज्ञानातील केवळ ज्ञानशक्ती पुरेशी नाही. त्यामुळे भगवंताने सनातन संस्थेला मिळत असलेल्या ईश्‍वरी ज्ञानात ज्ञानशक्ती समवेत क्रियाशक्तीची जोड अधिक प्रमाणात दिली आहे. परिणामी ज्ञानातून कृती करण्याचे ज्ञान समाजाला मिळाल्याने अनेक जीव साधनेला उद्युक्त होतात.
प.पू. डॉक्टर आणि ज्ञानप्राप्तकर्ते साधक यांच्या माध्यमातून भगवंत ईश्‍वराच्या अनंत पैलूंचे ज्ञान समाजाला करून देत आहे. असे होणे आसुरी शक्तींना नको असल्याने त्या ज्ञानकार्याला मोठ्या प्रमाणात विरोध करतात. 

६. सध्या चालू असलेल्या ज्ञानकार्याचे सप्तलोक आणि सप्तपाताळ यांवर होणारे परिणाम 
      संत समष्टीला उपयोगी असे विविध प्रश्‍न काढतात आणि त्यांची उत्तरे ज्ञानातून मिळवण्याची सेवा ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांची चालू आहे. या प्रक्रियेतून ईश्‍वरी ज्ञान पृथ्वीवर अवतरते. त्या वेळी सप्तपाताळ आणि सप्तलोक यांवर पुढील परिणाम होतो.
६ अ. सप्तपाताळ
१. वाईट शक्तींचे रहस्य ईश्‍वरी ज्ञानातून उलगडले की, त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटून त्यांच्या मनात ज्ञानाशी संबंधित सेवा करणार्‍यांविषयी क्रोध उत्पन्न होतो, तसेच त्यांचे ईश्‍वरी ज्ञानाविषयी उपहासात्मक बोलणे होते.
२. प.पू. डॉक्टर आणि ज्ञानप्राप्तीच्या सेवेशी संबंधित साधकांवर सूक्ष्मातून आक्रमण करण्याचे वाईट शक्ती नियोजन करतात.
३. सूक्ष्म युद्धात जिंकण्यासाठी वाईट शक्ती त्यांची शक्ती पणाला लावतात. त्या हरू लागल्या की, संबंधितांवर सूक्ष्मातील पर्यायी आक्रमणाचा लगेच विचार करतात.
४. एवढे करूनही ईश्‍वरी ज्ञान समष्टीपर्यंत पोचले, तरी ते वाचण्याचा विचार समाजाला येऊ नये, यासाठी वाईट शक्ती प्रयत्नशील असतात.
५. ईश्‍वरी ज्ञानाचा गैरअर्थ लावून ज्ञानसेवेशी संबंधित जिवांना न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवण्याचा विचार सध्या वाईट शक्तींकडून चालू आहे; परंतु हे भगवंताचे कार्य असल्याने त्यात त्यांचा निभाव लागणार नाही.
६ आ. सप्तलोक
१. ईश्‍वरी ज्ञानाच्या कार्यात विविध देवता, दिव्यात्मे आणि ऋषि आपली कृपादृष्टी ठेवतात आणि ज्ञानकार्यातील वाईट शक्तींचे अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्नशील असतात.
२. ज्ञानकार्यात जेव्हा वायूदेवता, अग्निदेवता अथवा उच्च देवता यांच्या कार्याचे वर्णन येते, त्या वेळी त्या त्या देवतांचे ज्ञानाच्या माध्यमातून गुणवर्णन होत असल्याने आणि त्याद्वारे मनुष्याकडून संबंधित देवतांची भक्ती होत असल्याने त्या ज्ञानप्रक्रियेतील साधकांवर प्रसन्न होतात.
३. सूक्ष्म-लोकातील देवता, दैवी शक्ती, दिव्यात्मे आणि ऋषि शून्यावस्थेत असतात; परंतु प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातून ज्ञानगंगा पृथ्वीवर अवतरित होत आहे, हे लक्षात येताच त्यांची दृष्टी पृथ्वीकडे लागते.
४. ईश्‍वरी ज्ञान पृथ्वीवर येणे, ही भगवान श्रीविष्णूची इच्छा आहे. हे कार्य ईश्‍वरी ज्ञानप्राप्तकर्ते साधक करीत आहे. त्यामुळे सूक्ष्म-जगतात अशा साधकांना विष्णुदूत संबोधले जाते.
५. ज्ञानकार्याचा बाह्यतः छोटासा वाटणारा विषय सूक्ष्म-जगतात मोठा परिणाम करतो. त्यामुळे त्याचा सर्व स्तरांवर मोठा परिणाम होत असतो; कारण यांवर पृथ्वीवरील मनुष्याची जडणघडण अवलंबून असते. 

 ७. अन्य सूत्र
      प.पू. डॉक्टरांना अपेक्षित विविध विषयांचा ईश्‍वरी ज्ञानाद्वारे करावयाच्या अभ्यासापैंकी बहुतेक भाग येत्या दीड वर्षात पूर्ण होण्यामागील कारणमीमांसा १. दीड वर्षानंतर आपत्काळाचे ढग जमा होतील. अशा वेळी आपत्काळ आणि हिंदु राष्ट्र निर्मितीतील जडणघडण यांसारख्या स्थुलातील गोष्टींकडे प.पू. डॉक्टरांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. हा कालावधी वर्ष २०१९ ते २०२२ असा असणार आहे. या ४ वर्षांत सूक्ष्मातील गोष्टींचा अभ्यास करण्यास त्यांच्याकडे वेळ अल्प असणार आहे.
२. वर्ष २०२२ नंतर प.पू. डॉक्टरांना स्थूल देहाच्या वयापरत्वे निर्माण झालेल्या मर्यादा सूक्ष्मातील अभ्यासाला मर्यादित करतील. त्यामुळे चालू दीड वर्षाचा काळ आध्यात्मिक संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या काळात सूक्ष्मविषयक अभ्यास बहुतांशी पूर्ण होणे महत्त्वाचे आहे.
 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.११.२०१६)
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn