Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

वैचारिक अपराधांची परिसीमा गाठणारे श्रीपाल सबनीस !

     सध्याच्या पुरोगामी वर्तुळातील काही वाचाळवीरांपैकी श्रीपाल सबनीस हे एक होत. प्रसिद्धीची हौस भागवण्यासाठी स्वत:चे फुटकळ विचार समाजात पसरवून अपसमज निर्माण करण्यात सबनीस यांचा अव्वल क्रमांक येईल ! साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यापूर्वी सबनीस यांना कोणी ओळखतही नव्हते. अध्यक्षपद गाठल्यावर त्यांनी त्यांचा वैचारिक आतंकवाद चालू केला. प्रत्येक भाषणातून मोदींवर टीका करणे हा साहित्यिक (?) म्हणवणार्‍या सबनीस यांचा छंदच झाला आहे. साहित्याच्या नावाखाली त्यांनी राजकारण चालू केले, तसेच वाचाळ भाषेत नरेंद्र मोदी यांचाही एकेरी उल्लेख करून टीकेचे धनी झाले. प्रत्येक वेळी स्वत:च्या वक्तव्यातून दुसर्‍यांना न्यून लेखणे आणि त्यातून स्वत:ची विद्वत्ता (?) दाखवणे, हा सबनीस यांचा एकमेव उद्योग दिसतो. यांचे स्वत:चे कर्तृत्व काय, हा मोठा प्रश्‍नच आहे. संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर अहंभावाने पछाडलेल्या सबनीस यांनी सपत्नीक व्यासपिठावर जाऊन मिरवण्याव्यतिरिक्त अन्य काहीच केले नाही. सातत्याने बेताल आणि मूर्खपणाची बडबड करून नवीन वाद ओढवून घेतले. हे करत असतांना आपण आपल्यापेक्षा केवळ वयानेच नाही, तर कार्यानेही श्रेष्ठ असणार्‍या सर्व दिग्गजांच्या परंपरेची खिल्ली उडवत आहोत, याचे भानही त्यांना राहिले नाही. म्हणूनच त्यांच्यासाठी अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून माघार घेणारे साहित्यिक सदानंद मोरे यांनीही सबनीस यांच्यासमवेत कधीही व्यासपिठावर जाणार नाही, असा सावध पवित्रा घेतला.
      श्रीपाल सबनीस कधी क्रूरकर्मा टिपू सुलतानला देशभक्त आणि स्वातंत्र्यसेनानी म्हणतात, तर कधी मुसलमान स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास डावलल्याची बांग झोडतात. टिपू सुलतान कोण होता, हे समजण्यासाठी संपूर्ण इतिहासाचा अभ्यास तर सोडाच निदान सावरकरांचे ‘इतिहासाची सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक एकदा जरी वाचले असते, तरी या महाशयांच्या डोक्यात प्रकाश पडला असता.
सबनीस यांचा वैचारिक आतंकवाद दर्शवणारी काही वक्तव्ये -
१. मंदिरांचा पैसा शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी उपयोगांत आणावा आणि भाविकांनाही सुविधा द्याव्यात. 
२. मोदींपेक्षा पवारांना दुष्काळ अधिक कळतो. 
३. मागील ८८ साहित्य संमेलनांतील अध्यक्षांनी मुसलमान, ख्रिस्ती, आदिवासी आणि दलित यांच्यासाठी अवाक्षरही काढले नसून मी त्यांच्यासाठीच निवडणूक लढवली आहे. 
     सबनीस यांची वरील वक्तव्ये ही निराधार, धादांत खोटी, समाजविघातक, हिंदुद्वेष्टी आणि समाजाची दिशाभूल करणारी आहेत, हे जनतेने लक्षात घ्यायला हवे. ज्यांच्या व्यासपिठावर जाणार त्यांचा उदोउदो करणे आणि हातात ध्वनीक्षेपक आला की स्वत:चे (कु)विचार पसरवणे, हाच सबनीस यांचा उद्योग आहे. मीच काय तो मोठा, मला अधिक कळते, अशी वृत्ती असणारे सबनीस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत, हे दुर्दैवी आहे !
- श्री. नीलेश देशमुख, सानपाडा, नवी मुंबई.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn