Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती

कोलंबिया येथील श्री. जर्मन मोरेनो यांच्या साधनेचा प्रवास 
आणि त्यांना रामनाथी आश्रमातील वास्तव्यात आलेल्या अनुभूती

      १० ते १४ डिसेंबर २०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उपस्थित असलेल्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती पुढे देत आहोत.
१. साधनाप्रवास
१ अ. लहानपणापासून अध्यात्म आणि आध्यात्मिक उपाय यांविषयी जिज्ञासा असणे अन् कोणी मार्गदर्शक नसल्याने ग्रंथात दिल्यानुसार प्रयत्न करणे : १५ व्या वर्षापासूनच श्री. जर्मन यांना चक्र, उपाय, इत्यादीची जिज्ञासा होती. ते ध्यान लावण्याचा प्रयत्न करायचे. त्यांना कुणी मार्गदर्शक नव्हता. ते ग्रंथांत दिलेल्या माहितीनुसार प्रयत्न करत असत. त्यांच्या ध्यान लावण्यात नियमितपणा नव्हता. ते कॅथलिक असल्याने चर्चमध्ये जात असत; परंतु श्रद्धेने नाही.
१ आ. वाईट शक्तींचा त्रास होत असतांना स्वतःचे देहावर नियंत्रण नसल्याचे लक्षात येणे : ६ मासांपूर्वी त्यांना वाईट शक्तींचा त्रास होऊ लागला. ते चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करू लागले. त्यामुळे त्यांच्या आईला काळजी वाटली. एकदा त्यांना जाणवले, वाईट शक्तीने त्यांच्यावर ताबा मिळवला आहे. त्या वेळी त्यांचे स्वतःच्या देहावर नियंत्रण नव्हते.
१ इ. ईश्‍वरप्राप्तीची पुष्कळ तळमळ असणे : आध्यात्मिक आयामाबद्दल अधिक जाणून घेणे, आध्यात्मिक उन्नती करणे आणि सत्सेवेत सहभागी होणे, यांसाठी ते या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. श्री. जर्मन यांना ईश्‍वरप्राप्तीची पुष्कळ तळमळ आहे. भारतात येऊन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ते नोकरी सोडून आले.
- सौ. श्‍वेता क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय 
२. रामनाथी आश्रमातील वास्तव्यात आलेल्या अनुभूती
२ अ. आश्रमातील ध्यानमंदिरात प्रवेश केल्याबरोबर मला तणावमुक्त होऊन तेथील वातावरणाने माझ्यात पालट होत असल्याचे जाणवले. 
२ आ. आश्रमातील वातावरण आणि साधक यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा मिळणे अन् ही वेगळ्या लोकातील अनुभूती असल्याचे जाणवणे : आश्रमातील वास्तव्याने माझ्या ऊर्जेत पालट होतांना जाणवला. मला स्वतःमध्ये शांती जाणवली. साधकांच्या सहवासात गेल्या २ दिवसांपासून मला स्वत:त सकारात्मक पालट झाल्याची जाणीव झाली. आश्रमात पू. सिरियाकदादा आणि सर्व साधक यांची भेट झाल्यावर वातावरणातून अन् सर्व साधकांकडून सकारात्मक ऊर्जा मिळाली. ही अनुभूती वेगळ्याच लोकातील असल्याचे जाणवले. अशी अनुभूती मी यापूर्वी कधीही घेतली नव्हती. 
२ इ. आश्रमात आल्यापासून मनात आलेल्या विचाराचे लगेचच विस्मरण होणे आणि हे स्वतःसाठी एक मोठे स्थित्यंतर असल्याचेे जाणवणे : माझे मन कशावरही केंद्रित रहात नाही, असे मला जाणवते. ११.१२.२०१६ या दिवशी मी माझा भ्रमणसंगणक आणि वही विसरलो; परंतु हा विसराळूपणा नाही, हेही लक्षात येते. खरेतर मी छोट्या-छोट्या तपशीलाबद्दल दक्ष आणि नियोजनकुशल आहे; परंतु आश्रमात आल्यापासून मला जाणवते, माझ्या मनात काही विचार आल्यावर त्याचे लगेच विस्मरण होते. मला आंतरिक जाणीव होत आहे की, मी वर्तमानकाळात रहात आहे. मला विसराळूपणा या स्वभावदोषावर प्रयत्न करायला हवेत. असे असले, तरी माझ्यासाठी हे एक मोठे स्थित्यंतर आहे. माझे मन भूत आणि भविष्य काळात गुरफटलेले नाही, हा एक वेगळाच अनुभव आहे.
२ ई. आश्रमातील वास्तव्याविषयी वाटत असलेली कृतज्ञता : माझ्यासाठी आश्रमात येणे, हीसुद्धा एक आध्यात्मिक अनुभूतीच आहे. आश्रमातील वास्तव्य हा एक अद्वितीय अनुभव असून आश्रमात येण्याची संधी मिळाली, या दैवी कृपेबद्दल मनात कृतज्ञता वाटते. हे साध्य करून देणारे सर्व साधक आणि संत यांच्याबद्दलही मी कृतज्ञ आहे. 
२ उ. महामृत्यूंजय यज्ञाच्या वेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे आणि त्यामुळे देहाची शुद्धी झाल्याचे जाणवणे : आश्रमात महामृत्यूंजय यज्ञ चालू असतांना वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होतांना जाणवली आणि देहाची शुद्धी झाल्याची जाणीव झाली. माझे ध्यान लागले. या अनुभूतीने मला दिवसभर उत्साही वाटले.
अंथरुणावर पडून प्रार्थना करत असतांना एका 
व्यक्तीने भारतात जाऊन माझ्या चरणी नतमस्तक होण्याची 
तुझी वेळ आली आहे, असे सांगणे आणि रामनाथी आश्रमाच्या स्वागतकक्षातील 
प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहून दर्शन दिलेली व्यक्ती हीच असल्याचे लक्षात येणे 
      एके दिवशी अंथरुणावर पहुडून प्रार्थना करत असतांना मला एक व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीने सांगितले, भारतात जाऊन माझ्या चरणी नतमस्तक होण्याची तुझी वेळ आली आहे. त्यानंतर मी आध्यात्मिक उपायांचा शोध घ्यायला आरंभ केला. त्या वेळी माझा एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाशी संपर्क आला. मी संकेतस्थळावरील लेखांचे वाचन आणि नामजप चालू केला. मला दत्त आणि इतर देवता यांच्या नामजपांमुळे बरे वाटायला लागल्यानेे मी नामजप करणे चालू ठेवले. पुढे मी एस्.एस्.आर्.एफ्.च्या सत्संगात सहभागी झालो. मी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कार्यशाळेसाठी नाव नोंदवले. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी मी रामनाथी आश्रमात प्रवेश केला. तेव्हा स्वागतकक्षात मला प.पू. भक्तराज महाराजांचे मोठे छायाचित्र दिसले. त्या छायाचित्राकडे पाहिल्यावर मला भावाश्रू आवरेनासे झाले. मला झोपेत दर्शन दिलेली व्यक्ती हीच होती. 
- श्री. जर्मन मोरेनो, बोगोटा, कोलंबिया. (१३.१२.२०१६)
सिंगापूर येथील श्री. केल्विन यांचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती
- श्री. केल्विन
१ अ. मित्रासाठी आध्यात्मिक उपाय शोधतांना एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात येणे आणि मित्राला मीठ-पाण्याच्या उपायांविषयी सांगणे : श्री. टियर जी बिंग, केल्विन हे सिंगापूर येथील आहेत. २००७ या वर्षी त्यांची पत्नी पहिल्यांदा गर्भवती असतांना त्यांनी देवळात जाऊन अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी प्रार्थना केली होती. त्यांचे माता-पिता बौद्ध धर्मीय असून त्यांची बहीण ख्रिस्ती धर्मीय आहे. श्रीमद्भगवद्गीता हा त्यांचा आवडता ग्रंथ आहे. त्यांना ब्रह्मांड, त्याची परिमाणे, परग्रहांवरील जीव यांविषयी जिज्ञासा आहे. ते पुष्कळ वाचन करतात; परंतु ते कृतीत उतरवत नाहीत. एक वर्षापूर्वी त्यांच्या मित्रासाठी आध्यात्मिक उपाय शोधत असतांना ते एस्.एस्.आर्.एफ.्च्या संपर्कात आले आणि त्यांनी मित्राला मीठ-पाण्याच्या उपायांविषयी सांगितले. मित्र नियमितपणे उपाय करू लागला; पण श्री. केल्विन यांचे उपाय होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मित्राने श्री. केल्विन यांच्यासाठी एक बालदी विकत आणली. त्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे नियमितपणे प्रयत्न केले. 
१ आ. आध्यात्मिक ग्रंथ उशीखाली ठेवून झोपल्यानंतर उपाय व्हावे, यासाठी प्रार्थना केल्याने होणारा आध्यात्मिक त्रास उणावणे : ते आणि मित्र दोघेही सिंगापूर येथील माझ्या प्रवचनाला उपस्थित होते आणि त्यानंतर ते सत्संगांत सहभागी झाले आहेत. त्यांनी श्री गुरुदेव दत्त । हा लघुग्रंथ खरेदी करण्यापूर्वी ते एका उपाहारगृहात जेवले होते. ते जेवण चांगले नसल्याने श्री. केल्विन यांना घरी गेल्यावर त्या जेवणाचा पुष्कळ त्रास झाला. त्यांची प्रकृती पुष्कळ बिघडली. रात्री झोपतांना त्यांनी तो लघुग्रंथ उशाखाली ठेवला. त्या वेळी त्यांनी उपाय होण्यासाठी देवाला प्रार्थना केली. त्यानंतर त्यांना उलट्या होऊन त्यांचा त्रास उणावला आणि हलकेपणा जाणवला. 
१ इ. जीवनाच्या ध्येयाच्या शोधात असणे : ते जीवनाच्या ध्येयाविषयी सुस्पष्टतेच्या शोधात आहेत. इतरांना साहाय्य करण्याची त्यांची इच्छा किती प्रामाणिक आहे, याविषयी तेे चिंतनशील आहेत आणि साधनामार्गाच्या शोधात आहेत. 
- सौ. श्‍वेता क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय 
२. अनुभूती 
२ अ. श्रीकृष्णाच्या चित्राकडे आपोआप लक्ष वेधले जाऊन ते सजीव वाटणे : ११.१२.२०१६ या दिवशी सकाळी ९.३० वाजता मी स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राच्या बाजूने जात असतांना माझे लक्ष आपोआप चित्राकडे वेधले गेले. श्रीकृष्ण मला अत्यंत सजीव जाणवला. या चित्रातील रंग भावस्पर्शी असून यापूर्वी मी पाहिलेल्या चित्रांशी तुलना केल्यानंतर ते एकमेवाद्वितीय असल्याचे मला जाणवले. 
२ आ. श्रीकृष्णाचे चित्र पहाण्यासाठी पुन्हा गेल्यावर त्याच्या मुखावरील हावभाव पालटत असून तो प्रेमाने पहात असल्याचे जाणवणे : त्यानंतर दुपारी आश्रम पहात असतांना मी पुन्हा त्याच श्रीकृष्णाच्या चित्राकडे बारकाईने पाहिले. तो खरोखरच माझ्याकडे पहात आहे, असेे मला त्याच्या डोळ्यांतून जाणवले आणि त्यामुळे श्रीकृष्णाच्या डोळ्यांमध्ये सरळ पहाणे, म्हणजे त्याचा अनादर करण्यासारखे होईल, या विचाराने मी माझी दृष्टी खाली वळवली. त्यानंतर परत मी खास श्रीकृष्णाचे चित्र पहाण्यासाठी गेलो आणि या वेळी मला त्याच्या मुखावरील हावभाव पालटत असून तो माझ्याकडे अतिशय प्रेमाने पहात आहे, असे मला जाणवले. माझी तीव्र भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.
३. आश्रमातील भिंतीवर हात ठेवल्यानंतर ती अधिक जवळ 
आल्यासारखी वाटणे आणि नंतर भिंतीत तरंग असल्याप्रमाणे हातांना जाणवणे 
     कार्यशाळेच्या कालावधीत सूक्ष्मातील प्रयोगाच्या अंतर्गत श्री. शॉन क्लार्क यांनी नामजप करत आश्रमाच्या भिंतीला हाताच्या तळव्यांचा स्पर्श करायला सांगितला आणि त्यानंतर भिंतीवर डोके टेकवायला सांगितले. भिंतीवर हात ठेवल्यानंतर ती अधिक जवळ आल्यासारखी वाटली आणि डोके टेकवल्यानंतर मला आधी कपाळावर नाडीचे ठोके जाणवले आणि नंतर भिंतीमध्ये तरंग असल्याप्रमाणे हातांना जाणवले. माझे शरीर पुढे आणि त्यानंतर वर सरकल्याप्रमाणे जाणवले. मी हवेत तरंगत असल्याप्रमाणे मला जाणवत होते. हे सर्व अद्भुत होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn