Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार करणार्‍या प्रभावी चित्रफीती !

‘देश बदल रहा है ।...’
‘एक विद्यार्थी...वडिलांसमवेत तो शालोपयोगी साहित्याच्या दुकानात जातो... दुकानदार त्याला हिंदी चित्रपटातील अभिनेते सलमान खान, आमीर खान यांची छायाचित्रे मुखपृष्ठावर असलेल्या वह्या दाखवतो; परंतु त्या पाहून त्याचे समाधान होत नाही. तितक्यात त्याचे लक्ष जाते ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेल्या वहीवर ! ती वही हातात मिळताच विद्यार्थ्याच्या तोंडवळ्यावरून राष्ट्राभिमान ओसंडून वाहू लागतो...’ हिंदूंनो, ही पुस्तकातील गोष्ट नसून वरील प्रसंग एका चित्रफीतीच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे... ! हेच आहे बदलणार्‍या....हिंदुत्वाकडे आकर्षित होणार्‍या भारताचे एक छोटेसे उदाहरण !... ही प्रभावी संकल्पना चित्रफीतीच्या माध्यमातून पुढे आली आहेे, ते २५ डिसेंबर या दिवशी येथे होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने...! सर्वांना हिंदु धर्मजागृती सभेला येण्याची प्रेरणा मिळावी, अधिकाधिक हिंदू राष्ट्र अन् धर्म कार्यार्थ कृतीशील व्हावेत, तसेच आजच्या तंत्रयुगात अल्प कालावधीत अधिकाधिक जणांपर्यंत धर्मसभेची माहिती पोचवता यावी, यासाठी अशा प्रकारच्या विविध प्रबोधनात्मक संकल्पना चित्रफीतींच्या माध्यमातून मांडून जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार केला जात आहे.
चित्रफीतीमधील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
  • जळगावमध्ये मागील वर्षीच्या हिंदु धर्मजागृती सभेनंतर मिळालेले यश
              येथे हिंदूंसाठी पांडववाडा खुला झाला !
              येथील पशूवधगृह बंद झाले !
  • हिंदूंनो, अशा प्रकारचा पालट केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशाताच होत आहे.
  • शेवटी केलेले आवाहन ! - मी येतोय... तुम्हीही या...येतांना मावळ्यांना घेऊन घ्या...!
  • चित्रफीतीत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेली वही निवडण्याच्या प्रसंगासाठी राष्ट्रप्रेम जागृत होईल अशा आशयाचे पार्श्‍वसंगीतही देण्यात आले आहे. 
  ....हिंदु राष्ट्रकी ओर जा रहा है । 
     हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी सिद्ध केलेल्या आणखी एका चलचित्रामध्ये हिंदुत्वाचे प्रतीक असलेल्या भगवा ध्वजाच्या मान राखण्याचा प्रयत्न दाखवला आहे.
     रस्त्यावर चालत जाणार्‍या एका हिंदु मुलाला रस्त्याच्या दुभाजकांमध्ये असलेल्या विजेच्या खांबांवर भगवे ध्वज फडकतांना दिसतात. त्यापैकी एका खांबावरील ध्वजाची काठी आणि ध्वजाची टोके जमिनीच्या दिशेने कललेली असतात. अन्य ध्वज दिमाखात उभे असतांना हाच ध्वज खाली आलेला पाहून धर्माभिमानी मुलाला रहावत नाही. भगवा ताठ हा मानेनेच फडकला पाहिजे, हे तो ठरवतो आणि......
      त्याचा बुद्धीने, मनाने, शरिराने काय करू, याचा शोध चालू होतो. प्रथम स्वत: चढून हाताला भगवा लागतो का, हे पहातो. त्याची उंची पुरत नाही. तेव्हाच त्या बाजूने चाललेली २ हिंदु मुले दिसतात, तो त्यांना बोलावतो, त्यांचे साहाय्य घेतो. सर्व मुले आळीपाळीने वर चढून ध्वज सरळ करण्यासाठी धडपडत असतात; मात्र ते त्यांना साध्य होत नसते. याच वेळी रस्त्यावरून जाणारा अन्य युवक यांचे प्रयत्न पाहून पुढे जातो, शेजारी दुचाकींवर असणारे युवक आपल्याच नादात गप्पा मारत असतात. शेवटचा प्रयत्न म्हणून धर्माभिमानी मुलगा साहाय्यासाठी आलेल्या एका मुलाच्या खांद्यांवर बसतो आणि ध्वजाच्या काठीपर्यंत हात पोेचून काठी आणि भगवा ध्वज नीट करतो. तेव्हा त्याच्या या भगव्याची शान वाढवण्याच्या कृतीविषयी आसपासची सर्व मुले आणि युवक एकत्र येऊन त्याला शाबासकी देतात....
      याच वेळी पार्श्‍वगीत म्हणून ‘वीर शिवाजी....’ हे वीरसरपूर्ण गीत चालू होते.
      यातून दिलेला बोध....हिंदुत्वाची शोभा वाढवण्याची कृती करतांना हिंदु मुलगा त्वरित एकट्याने पुढाकार घेऊन कृती करतो, तेव्हा त्याला केवळ मोजकीच हिंदु मुले साहाय्य करतात, अन्य काही हिंदू मात्र प्रारंभी केवळ बघ्याचेच काम करतात. मुलाच्या धडपडीला यश आल्यावर अन्य हिंदूंनाही आनंद होऊन ते पुढे येतात. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्याला जागृत हिंदूंनी प्रारंभ केल्यावर अन्य हिंदूही सहभागी होणारच आहेत, तेव्हा वाटचाल चालू करा, हा बोधही चलचित्र देऊन जाते......


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn