Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उन्नतीचे टप्पे सांगितल्यावर त्याचे श्रेय त्यांनाच देऊन कु. दीपाली पवार यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. दीपाली पवार
साधकांना मार्गदर्शक ठरणारी कु. दीपाली पवार यांची साधनेतील वाटचाल
     साधना करणे म्हणजे सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणे. नवविधा भक्तीद्वारे भक्त त्याच्या प्रकृतीप्रमाणे ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करतो. कु. दीपाली पवार यांचा ‘परात्पर गुरु म्हणजे श्रीकृष्ण’, असा भाव आहे. त्यांच्या जीवनातील सर्व घडामोडी पत्राद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगणे, ‘तेच श्रीकृष्ण कसे आहेत’, हे त्यांना विविध उदाहरणांतून पटवून देणे, त्यांच्याशी सूक्ष्मातून झालेल्या संवादाची चित्रे रेखाटून त्यांना देणे आणि त्यांना सखा मानून प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगात शुभेच्छापत्रे देणे, अशा प्रकारे त्या ईश्‍वराच्या अनुसंधान राहिल्या.    पुढे त्यांना काही विषयांवर ईश्‍वराकडून ज्ञानही मिळाले. हे सर्व करतांना त्यांच्यामध्ये निरपेक्षता होती. त्यामुळे त्यातूनही त्यांची साधना होत गेली. ‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: ।’ म्हणजे ‘द्रष्टा दृश्य पाहिल्याने त्यात बद्ध होऊन जातो’, या न्यायाने त्या सतत कृष्णाच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) अनुसंधानात राहिल्याने सगुणातून निर्गुणाकडे, स्थुलातून सूक्ष्मात आणि स्वेच्छेतून ईश्‍वरेच्छेकडे हे साधनेचे टप्पे गाठून त्यांची आध्यात्मिक प्रगती होत गेली. गोपींनीही मधुरा भक्तीद्वारे श्रीकृष्णावर प्रीती (निरपेक्ष प्रेम) केली. कु. दीपाली पवार यांची ही साधनेतील वाटचाल मधुरा भक्तीची आठवण करून देते. त्यांच्या साधनेचा प्रवास उलगडणारी लेखमाला चालू करत आहोत. त्यातून वाचकांची ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाण्याची ओढ निर्माण होवो, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
    कृष्णा, तुझ्या चरणी पुष्कळ पुष्कळ कृतज्ञता ! माझ्या मनातल्या प्रश्‍नांना उत्तरे देऊन माझे अज्ञान दूर केल्यामुळे ! तू दिलेल्या प्रश्‍नांच्या उत्तरांमुळे अध्यात्मशास्त्र कळले आणि उत्तरे वाचून मला आश्‍चर्याचा धक्काच बसला; कारण ‘अध्यात्माच्या या टप्पाला कधी आणि कशी येऊन पोचले’, हे माझे मला कळलेच नाही. ‘मी अध्यात्मात या टप्प्याला पोचेन’, याचा स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता.
     कृष्णा, हे सर्व तुझ्यामुळे घडले. मी तुझ्या प्रेमात पडत गेले आणि तुझ्या प्रेमाने मला या स्थितीला आणून सोडले. यावरून तुझे प्रेम किती श्रेष्ठ आहे, हे लक्षात आले. तुझ्या प्रेमात पडल्याने मनुष्याच्या जीवनात काय काय पालट होत जातो, हे मी स्वतःच्या जीवनात अनुभवत आहे.
     कृष्णा, तुझ्या प्रेमाचे मूल्य किती श्रेष्ठ आहे ! मला असे वाटते, ‘अध्यात्मात कोणाला प्रगती करायची असेल, तर त्याने मन आणि बुद्धी यांद्वारे अध्यात्माचा फार विचार न करता केवळ देवावर प्रेम करत जावे. देवाचे प्रेमच तुम्हाला अध्यात्मात कधी पुढे घेऊन जाईल, हे तुमचे तुम्हालाच कळणार नाही. हे मी माझ्या उदाहरणावरून सांगत आहे. कृष्णा, तुझ्या प्रेमामध्ये फार, म्हणजे फार सामर्थ्य आहे. तुझ्यावर प्रेम केल्यावर ‘तुझे प्रेम मनुष्याला काय काय देऊ शकते’, हे मी स्वतः अनुभवत आहे. कृष्णा, मला आज अध्यात्मातल्या या टप्प्याला घेऊन आल्यामुळे मी तुझ्या चरणी पुन्हा एकदा कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.
     कृष्णा, आतापर्यंत जसे अध्यात्मात प्रगती करण्यासाठी काही विचार न करता केवळ तुझ्यावर प्रेम करत गेले, तसेच यापुढील प्रवासही काही विचार न करता केवळ तुझ्या ओढीनेच तुझ्यासमवेत पुढे पुढे जायचे आहे. कृष्णा, मला आता स्वेच्छा नको आहे. मला माझे यापुढचे संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ तुझ्या इच्छेने जगायचे आहे. ‘अध्यात्माचा यापुढचा प्रवास कसा असतो ? कसा असेल ?’ हे मला ठाऊक नाही आणि ठाऊक करून घ्यायचेही नाही; कारण आतापर्यंत अज्ञानात राहूनही तू माझी आध्यात्मिक प्रगती करून घेतली आहेस. तशीच पुढची प्रगती अज्ञानात राहूनच होऊ दे, म्हणजे माझे अखंड लक्ष केवळ तुझ्याकडेच राहील. माझ्या मनात केवळ आणि केवळ तुला प्राप्त करण्याचीच तीव्र इच्छा आणि विचार रहातील आणि मन इतर विचारांत अडकणार नाही.
     कृष्णा, साधनेचा पुढचा प्रवास तुझ्या इच्छेने करता येण्यासाठी मला पुष्कळ म्हणजे पुष्कळ आशीर्वाद दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
- श्रीकृष्णाची,
कु. दीपाली पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०१६)
साधकांनो, स्वतःचा अभ्यास कसा करायचा, हे
कु. दीपाली पवार हिच्या उदाहरणावरून शिका ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
     ‘सनातनचे सहस्रो साधकच नव्हे, तर जगभरातील आतापर्यंतच्या लाखो साधकांनी साधना करतांना स्वतःच्या कृती, विचार, भावना आणि भाव इत्यादींचा कु. दीपाली पवार हिने केलेल्या अभ्यासाप्रमाणे अभ्यास केल्याचे एकही उदाहरण नाही. वर्ष २०१३ ते २०१६ या काळात कु. दीपाली पवार हिने वेळोवेळी श्रीकृष्णाला लिहिलेल्या पत्रांतील लिखाण या लेखमालेत क्रमशः दिले आहे. तिच्या लेखमालेवरून ‘स्वतःचे निरीक्षण कसे करायचे ? त्यातून कसे शिकायचे ?’ इत्यादी अनेक गोष्टी साधकांना शिकता येतील. ‘हे शिकून साधकांनी जलद आध्यात्मिक करावी’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn