Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अजित पवार आणि संदीप बाजोरिया यांना उच्च न्यायालयाची नोटीस !

     भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई होण्यासाठी लोक न्यायालयात याचिका प्रविष्ट करतात ! याचा अर्थ त्यांच्यावर प्रशासन किंवा शासनकर्ते काही कारवाई करतील, अशी लोकांना आशा राहिलेली नाही ! न्यायालयाला जर भ्रष्टाचाराच्या याचिकांवर निवाडा देण्यात वेळ घालवाया लागत असेल, तर इतर प्रचलित व्यवस्था हव्यात कशाला ?
     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प आणि दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्पात झालेल्या आर्थिक अपव्यवहारास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाजोरिया कन्स्ट्रक्शन आस्थापनाचे संचालक संदीप बाजोरिया हे सामील आहेत, असा आरोप उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात प्रविष्ट केलेल्या नवीन दोन जनहित याचिकांमध्ये करण्यात आला आहे. कंत्राटदार श्री. अतुल जगताप यांनी या याचिका प्रविष्ट केल्या आहेत. न्यायमूर्ती श्री. भूषण धर्माधिकारी आणि इंदिरा जैन यांनी १३ डिसेंबर या दिवशी या प्रकरणी सुनावणी केल्यानंतर अजित पवार आणि संदीप बाजोरिया यांसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून १९ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.      अन्य प्रतिवादींमध्ये सिंचन विभागाचे सचिव, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आदींचा समावेश आहे. जगताप यांनी यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्प आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पात आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप करून दोन जनहित याचिका प्रविष्ट केल्या आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn