Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महाराष्ट्रातील पाळणाघरे ‘सीसीटीव्ही’ लावून अद्ययावत करणार ! - गृह राज्यमंत्री

     नागपूर - महिला आणि बालविकास कल्याण यांच्या वतीने पाळणाघरांसाठी एक सर्वंकष योजना आखण्याचे काम चालू आहे. तसेच राज्यातील खाजगी आणि शासकीय पाळणाघरे, शिशूगृहे या ठिकाणीही ‘सीसीटीव्ही’ लावून यंत्रणा अद्ययावत करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. खारघर (नवी मुंबई) येथील पाळणाघरातील बाळाला अफसाना शेख या आयाने अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणी भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी परिषदेत वरील प्रकरणाची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्या वेळी ते बोलत होते.
    राज्यातील पाळणाघरात काम करणार्‍या आयांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, लहान मुलांवर कोणाकडूनही अत्याचार झाल्यास त्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी दंडविधान दुरुस्ती करून विशेष शिक्षेची तरतूद करावी, तसेच या प्रकरणातील पाळणाघराच्या मालकांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी, असे निर्देश सभापतींनी या प्रकरणी दिले.
     खारघर येथे बाळाला केलेल्या या मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांनी तात्काळ पोलीस तक्रार प्रविष्ट केली नाही, तसेच त्या बाळाच्या पालकांनाच त्या ‘स्कूल’मधील ‘क्लोज सर्किट टीव्ही’चे चित्रीकरण पडताळण्यास सांगितले. अशा गंभीर चुकांप्रकरणी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ‘त्या पोलीस उपनिरीक्षकांचे तात्काळ निलंबन वा दूरगामी स्थानांतर करावे आणि त्यानंतर त्यांची चौकशी करावी, असे निर्देश दिले. (सभापतींना असे निर्देश का द्यावे लागतात ? कर्तव्यात कसूर करणार्‍यांचे नुसते निलंबन नको, त्यांना बडतर्फ करणेच आवश्यक, तसेच स्थानांतर करणे म्हणजे इतर ठिकाणी त्यांना गुन्हे करण्यासाठी मोकळीक देणे नव्हे का ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn