Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जळगावमधील विविध समाज संघटनांच्या प्रमुखांनी केला हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

बैठकीत डावीकडून १. पू. नंदकुमार जाधव २. श्री. सुनील घनवट आणि सर्व समाजाचे प्रमुख प्रतिनिधी
हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृतीशील होणार !
      जळगाव, २४ डिसेंबर (वार्ता.) - येथील विविध समाज संघटनांच्या प्रमुखांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार येथे आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केला. तसेच हिंदु समाजावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृतीशील होण्याचा मानसही बोलून दाखवला. जळगावातील विविध समाज संघटनांच्या प्रमुखांची एकत्रित बैठक २३ डिसेंबर या दिवशी येथे होणार्‍या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने उत्साहात पार पडली. या बैठकीला शहरातील मराठा, कुंभार, बेलदार, भावसार, जैन, नाभिक, सुतार, परीट, राजपूत आदी समाजांचे तसेच समाज संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. (हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात एकत्र येणार्‍या विविध समाजांच्या प्रमुखांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी हीच हिंदुत्वाची खरी शक्ती ! संपादक) या बैठकीला सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती होती. बैठकीचा आरंभ जळगावनगरीचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम यांच्या चरणी वंदन करून झाली. आरंभी समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी उपस्थित समाजबांधवांना आतापर्यंत सभेचा प्रसार कशा पद्धतीने झाला, याची माहिती करून देणारा माहितीपट (पॉवर पॉईट प्रेझेंटेशन) प्रोजेक्टरवर दाखवला.
     त्यानंतर समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट सभेची आवश्यकता स्पष्ट करतांना म्हणाले, इंग्रजांनी जातीचे राजकारण करून हिंदु समाज हिंदु म्हणून एकत्र येऊ दिला नाही. त्यामुळे आपण सर्वजण आज विविध जातींत विभागले गेलो आहोत. आज सर्वांनी एक हिंदु म्हणून एकत्र होणे आवश्यक आहे. आज हिंदु समाजावर होत असलेल्या धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या यांसारख्या आघातांना आळा घालण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही.
धर्मांधांचा आर्थिक कणा मोडण्याचा सर्व समाजप्रमुखांचा निर्धार
      बैठकीला उपस्थित समाज बांधवांनी एकमुखाने धर्मांधांवर आर्थिक बहिष्कार टाकून त्यांचा कणा मोडण्याचा निर्धार केला. सभेतही याविषयी जनजागृती करण्याची मागणी समाज बांधवांनी केली.
बैठकीला उपस्थित समाजबांधव
     भावसार समाजाचे सर्वश्री पंकज भावसार, सुनील भावसार; कुंभार समाजाचे श्री. चंद्रशेखर कापडे, कुमावत बेलदार समाजाचे श्री. शेखर कुमावत, मराठा समाजाचे श्री. प्रवीण पाटील, जैन समाजाचे श्री. नरेंद्र जैन, बारा बलुतेदार संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख श्री. राजकुमार गवळी, नाभिक समाजाचे श्री. गुलाबराव सोनावणे, सुतार समाजाचे श्री. विलास सांगोरे, राजपूत समाजाचे श्री. पिंटू राजपूत, परीट समाजाचे श्री. चेतन शिरसाळे, योग वेदांत समितीचे श्री. राजेश म्हस्के.
वैशिष्ट्यपूर्ण !
१. बैठकीत झालेल्या चर्चेत सर्व समाजाच्या प्रमुखांनी आपापल्या संपर्कातील सर्वच समाज बांधवांना सभेचे निमंत्रण देणार असल्याचे सांगितले. काहींनी आम्ही पदफेरी काढून सभेमध्ये सहभागी होणार असल्याचेही सांगितले.
२. उपस्थित सर्वांनी हिंदूंवर होणार्‍या आघाताच्या विरोधात एकजूट होण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मान्य केले. त्यासाठी सर्वांनी प्रतिमास एकदा एकत्र येऊन कृतिशील होण्याचा निर्धार केला.
३. श्री. पंकज भावसार यांनी सांगितले, तुमचा आम्हाला आधार वाटतो. आम्ही आजपर्यंत अशा संघटनासाठी शोधात होतो. यापुढे आपण एकत्रित होऊन कार्य करू.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn