Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आम्ही आतंकवादी आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांच्याही विरोधात ! - नरेंद्र मोदी

नुसते विरोधात असून काय उपयोग ? 
ठोस कारवाई करून आतंकवादी आणि त्यांना 
साहाय्य करणार्‍यांना कठोर शासन करायला हवे !
        अमृतसर - आम्ही केवळ आतंकवाद्यांच्या विरोधात नाही, तर त्यांना साहाय्य करणार्‍यांच्या किंवा आश्रय देणार्‍यांच्याही विरोधात आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. येथे ३ डिसेंबरपासून चालू झालेल्या हार्ट ऑफ एशिया परिषदेच्या दुसर्‍या दिवशी ते बोलत होते. आतंकवाद संपवण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. अफगाणिस्तान आणि इतर देशांमधील संपर्क वाढवा, असे आवाहनही त्यांनी परिषदेत सहभागी झालेल्या देशांना केले. (अन्य देशांना आवाहन करण्यापूर्वी आपण त्यासाठी काय प्रयत्न केले आहेत आणि त्याला किती यश मिळाले आहे, हेही सांगितले पाहिजे ! गेल्या काही दिवसांत आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे सैनिक हुतात्मा होत आहेत त्याला कधी आणि कसे रोखणार ? - संपादक)
सकाळी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
        डॉ. अशरफ घनी यांनी भाषण केले. ते म्हणाले की, आतंकवाद ही अफगाणिस्तानची सर्वात मोठी समस्या आहे. मागील वर्षी सर्वाधिक बळी अफगाणिस्तानात गेले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सूचीमधील ३० आतंकवादी गट अफगाणिस्तानात तळ बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. सीमेपलीकडील आतंकवाद आणि त्याला मिळणार्‍या निधीचा स्रोत आपण ओळखायला हवा आणि वेळीच त्यावर कार्यवाही करायला हवी. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आतंकवादाविरुद्ध लढायला हवे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn