Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महामार्गांवर मद्याची दुकाने नकोत ! - सर्वोच्च न्यायालय

  • मद्यविक्रीतून महसूल मिळवण्यासाठी त्यावर बंदी न घालणारी आतापर्यंतची सरकारे लोकशाही निरर्थक ठरवतात !
  • हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला आतापर्यंत का कळले नाही कि मद्यप्राशन करून महामार्गावर गाडी चालवण्यास सरकारचा पाठिंबा आहे ?
   नवी देहली - राष्ट्रीय महामार्ग असो कि राज्य महामार्ग कुठेही मद्याची दुकाने नसावीत. जरी या महामार्गांचा भाग शहराच्या मधून जात असला, तरी त्यांना अनुमती दिली जाऊ नये, तसेच त्यांच्यापर्यंत पोचणे सोपे नसावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले आहे. महामार्गांवर मद्याची दुकाने नसावीत, यासाठी ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेत महामार्गावर होणारे अपघात मद्यप्राशनाने होतात आणि त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, असे म्हटले आहे. 
न्यायालयाने पुढे म्हटले की, प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार आहे. राज्यांनी या अधिकाराचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्या अबकारी धोरणात पालट केला पाहिजे. त्यांनी महामार्गाच्या लगत मद्यालय चालू करण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) देणे बंद करावे. 
गेल्या वर्षात रस्त्यांवरील अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू !
   केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१४-१५ मध्ये देशभरात रस्त्यांवर एकूण ५ लाख अपघात झाले. यांत १ लाख ४६ सहस्र लोकांचा मृत्यू झाला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn