Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देशात शिक्षण घेऊन मातृभूमीच्या सेवेसाठी कार्यरत रहाणे, ही स्वा. सावरकर यांना आदरांजली ठरेल ! - डॉ. संजय देशमुख, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

स्वा. सावरकर यांच्या जीवनावर आधारित 
जगातील ७ व्या आणि देशातील १ ल्या 
‘थ्रीडी मॅपिंग लाईट-साऊंड शो’चे उद्घाटन !
        मुंबई, ११ डिसेंबर (वार्ता.) - कुटुंबाला आपणाकडून अपेक्षा असतेच; मात्र त्याच्या पलीकडे जाऊन देशाला काय देऊ शकतो, याचा विचार केला तर देश मोठा होईल. देशात शिक्षण घेऊन मातृभूमीच्या सेवेसाठी इथेच कार्यरत रहाणे, ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी भाषेतील ‘थ्रीडी मॅपिंग लाईट-साऊंड शो’चा उद्घाटन सोहळा डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे १० डिसेंबर या दिवशी पार पडला. या वेळी त्यांनी हे विचार व्यक्त कले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. अरुण जोशी, कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, माजी खासदार श्री. भारतकुमार राऊत, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह श्री. राजेंद्र वराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
        या वेळी डॉ. संजय देशमुख म्हणाले, ‘‘देहाकडून देवाकडे जातांना मधेे देश लागतो. ‘देशाचे आपण काहीतरी देणे लागतो’, ही भावना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रत्येक भारतियाच्या मनात तेवत ठेवली आहे. प्रत्येक क्षेत्रात जगात नेतृत्व करू शकेल, अशी माणसे आपल्याकडे आहेत. ही भावना सदैव प्रेरित व्हावी; यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘थ्री डी मॅपिंग लाईट साऊंड शो’सारखे अत्याधुनिक प्रयोग अंदमान आणि अन्यत्र दाखवणे आवश्यक आहे.’’
स्वा. सावरकर यांचा जीवनपट उलगडणारा 
‘थ्री डी मॅपिंग लाईट साऊंड शो’चा प्रभावी प्रयोग !
        स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या ‘थ्री डी मॅपिंग लाईट साऊंड शो’ या जागतिक दर्जाच्या प्रयोगाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर मराठीत असलेल्या या प्रयोगाचे हिंदी भाषेत रूपांतर करण्यात आले आहे. स्मारकाच्या ६६ फूट उंच आणि ९६ फूट रूंद भिंतीवर हा प्रयोग सादर करण्यात येत आहे. दृक्श्राव्य आणि त्रिमिती पद्धतीने स्मारकाच्या भिंतीवर साकारण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये प्रकाश आणि ध्वनी यांचा वापर करून स्वातंत्र्यवीर यांच्या क्रांतीकारी जीवनपटातील काही रोमहर्षक प्रसंग यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सातत्याने अत्याधुनिक तंत्राचा अवलंब केला. त्यामुळे त्यांचे कार्यदेखील अशाच प्रकारे अद्ययावत् समजल्या जाणार्‍या तंत्राच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. ओम राऊत यांनी या प्रयोगाचे दिग्दर्शन केले आहे. नियमित रात्री ८ वाजता स्मारकामध्ये या प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. हा प्रयोग पहाण्यासाठी सावरकरप्रेमींनी स्मारकाच्या कार्यालयातून पूर्वप्रवेशिका घ्याव्यात किंवा २४४६५८७७, ८८७९६५९७७० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn