Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुणे येथील श्री. अनिल गोविंद बोकील यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना वाढदिवसानिमित्त केलेला नमस्कार आणि आग्रहपूर्वक मागितलेले आशीर्वाद !

श्री. अनिल बोकील

पूज्य सद्गुरुमाई, 
आदेश !!! (म्हणजे अभेदभावाने प्रमाण !) 
     आज आपला वाढदिवस ! मायेतल्याच शब्दांनी आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. थोड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ! संवाद-रूपानं ! आवडतील ? आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच संतांना या शुभेच्छा आहेत आणि हे ‘शुभेच्छा देणे’ नव्हे, तर ‘आशीर्वाद मागणे’ आहे ! द्याच ! 
     सर्वच संत गुरुदेव आहेत. गुरुदेव म्हणजे चैतन्याचे स्वामीच ! शून्यभावात असणारे ! शून्यभाव कसला ? स्थुलातला शून्यभाव म्हणजे अनासक्ती (वैराग्य) आणि सूक्ष्मातला शून्यभाव म्हणजे मायेचा शून्यभाव ! शून्यभाव कसलाही असो ! तो मायेचा कि अस्तित्वाचा ? अस्तित्व हीसुद्धा मायाच नव्हे काय ? 

मग ‘शून्य-भाव’ मधला 
भाव’ काय आहे ? 
मायेचं रूप ! 
माया कसली ? 
विश्‍वरूपाची ! 
विश्‍वरूप कोणाचे ? 
चैतन्याचे ! 
चैतन्य कसले ? 
इच्छाशक्तीचे ! 
इच्छाशक्ती कसली ? 
सच्चिदानंदाची ! 
मग सच्चिदानंद काय ? 
अनासक्ती (वैराग्य) ! 
वैराग्य सच्चिदानंद असेल, 
तर ‘माया’ काय ? 
सच्चिदानंदच ना ! 
     आलो ना शेवटी अद्वैताकडेच ? सद्गुरुमाई समस्त संतजन आपण यांत स्थिर आहातच ! आपली समष्टी-भ्रमंती, समष्टी कार्य - हे सगळं प्रेरणाच आहे आमच्यासाठी ! ती प्रेरणा आम्ही घेतोच आहोत. आपल्याला देण्याजोगे आमच्याजवळ आहेच काय ? केवळ दोन्ही हात जोडून चरणी मस्तक ठेवणे ! बस्स ! एवढेच ! स्वीकार व्हावा गुरु ॐ ! 
- श्री. अनिल गोविंद बोकील, पुणे. (९.१२.२०१६) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn