Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मिरी हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी एका शहरात आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत अडथळा निर्माण करणार्‍या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना

कधी नव्हे एवढी हिंदुऐक्याची आवश्यकता असतांना हिंदूसंघटनाच्या कार्यात 
अडथळे निर्माण करणार्‍या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदूंचे रक्षण कसे करणार ?
      एका शहरात नुकतेच एक भारत अभियान - कश्मीर की ओर या उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. काश्मिरी हिंदूंच्या रक्षणासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाला भारतभरातील हिंदूंचा संघटित पाठिंबा मिळणे अपेक्षित होते; मात्र हिंदूंच्या संघटनाला खीळ घालण्याचा प्रयत्न काही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडूनच केला जात असल्याचा अनुभव हिंदुत्वनिष्ठांना आला. 
१. ज्या दिवशी शहरात हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती, त्याच दिवशी एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने दुसरी एक सभा आयोजित केली. हिंदु धर्मजागृती सभेला हिंदूंची उपस्थिती लाभू नये, या हेतूने मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने शहरात स्वतःची सभा आयोजित केली होती, असे स्थानिक हिंदुत्वनिष्ठांकडून समजले.
२. दुसर्‍या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचीही याच दिवशी शहरात सभा होती. ही सभा अन्य वेळेत होती; मात्र या संघटनेने आपल्या सभेची वेळ पालटून हिंदु धर्मजागृती सभेच्या वेळेतच आयोजित केली, तसेच या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील काही चौकांमध्ये थांबून हिंदु धर्मजागृती सभेला येणार्‍या हिंदूंना आपल्या संघटनेच्या सभेला जाण्यास सांगितले. 
     या दोन्ही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या अशा कृतींमुळे काश्मिरी हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला काही हिंदूंना उपस्थित रहाणे शक्य झाले नाही आणि व्यापक हिंदूसंघटनाच्या कार्यालाही खीळ बसली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn