Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवपूजेची आवड आणि सेवेची तळमळ असणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली संभाजीनगर येथील कु. देवश्री महेश देशपांडे (वय १४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. देवश्री देशपांडे एक आहे !
(कु. देवश्री हिची वर्ष २०११ मध्ये ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. आता ५५ टक्के आहे.)
१. पूजेची आवड असणे आणि स्वतःहून प्रतिदिन नियमितपणे पूजा करणे
कु. देवश्री देशपांडे
     ‘कु. देवश्रीला देवाची पूजा करायला पुष्कळ आवडते. सकाळची शाळा असूनही ती प्रतिदिन शाळेत जाण्यापूर्वी फुले तोडून आणते आणि सर्व सिद्धता (तयारी) स्वतः करून पूजा करते. एकदा फुले नसल्यामुळे मी पूजा केली नाही. हे देवश्रीला कळल्यावर ती मला म्हणाली, ‘‘बाबा, पूजा करणे म्हणजे काय केवळ देवांना फुले वाहणे आहे का ?’’ देवश्री तिन्हीसांजेच्या वेळीही न चुकता देवाजवळ दिवा लावते.’ - श्री. महेश देशपांडे (देवश्रीचे वडील)
२. नामजप करण्याची आवड असणे
    ‘देवश्रीला नामजप करायला पुष्कळ आवडते. ती घरी नियमितपणे नामजप करते. शाळेतील रिकाम्या वेळेेत ती नामजप करते.
३. सेवेची तळमळ
     मार्च मासात संभाजीनगर येथील हिंदु धर्मजागृती सभा झाल्यावर आम्ही पावती पुस्तकांची ‘ई.आर.पी.’त नोंद करण्याची सेवा करत होतो. ती सेवा मार्चपूर्वीच पूर्ण करायची होती. सेवा वेळेत पूर्ण व्हावी; म्हणून दुसर्‍या दिवशी परीक्षा असतांनाही देवश्रीने सलग चार घंटे बसून ती सेवा करण्यासाठी आम्हाला साहाय्य केले.
४. कोणताही खाद्यपदार्थ रुचकर आणि सात्त्विक बनवणे
अन् ती सुगरण असल्याचे पू. (कु.) स्वातीताईंनी सांगणे
     देवश्रीला निरनिराळे खाद्यपदार्थ बनवायची आवड आहे. कुुठलाही पदार्थ सात्त्विक कसा होईल, याकडेही तिचे लक्ष असते. चॉकलेट, वेगवेगळ्या भाज्या, केक, शेव असे विविध खाद्यपदार्थ ती एवढ्या लहान वयातही रुचकर बनवते. तिला नवीन खाद्यपदार्थ कसे बनवायचे, ते शिकायलाही आवडते. एकदा पू. (कु.) स्वातीताईंना शेव करून दिल्यावर पू. ताईंनी छान झाल्याचे आणि ती ‘सुगरण’ असल्याचे सांगून तिचे कौतुक केले.’
- श्री. महेश देशपांडे आणि सौ. कल्पना देशपांडे, संभाजीनगर (कु. देवश्रीचे आई-बाबा)
पालकांनो, हे लक्षात घ्या !
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
    यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn