Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अंनिसवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतो ! - श्री. प्रकाश मेहता, गृहनिर्माणमंत्री, भाजप

गृहनिर्माणमंत्री श्री. प्रकाश मेहता
यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे

वस्त्रोद्योगमंत्री श्री. अर्जुन खोतकर (उजवीकडे)
यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे

        नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - अंनिसने केलेल्या आर्थिक घोटाळ्यांच्या संदर्भात तिच्यावर कारवाई करावी आणि श्री तुळजापूर देवस्थान समितीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणाची चौकशी लवकर पूर्ण व्हावी, या दोन्ही मागण्यांसाठी मी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवतो, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि भाजपचे श्री. प्रकाश मेहता यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ते बोलत होते. 
अंंनिसच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी
करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार !
- श्री. अर्जुन खोतकर, वस्त्रोद्योगमंत्री, शिवसेना 
        अंनिसच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करणे, तसेच तिच्यावर प्रशासक नेमून अंनिसची सखोल चौकशी करावी, असे मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे, असे वस्त्रोद्योगमंत्री आणि शिवसेनेचे श्री. अर्जुन खोतकर यांनी सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी श्री. खोतकर यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn