Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नोटाबंदीमुळे पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी रोख पैसे नसल्याने ६५ वर्षीय वृद्धाला२ दिवसांनंतर करावा लागला अंत्यसंस्कार !

भविष्यात कठोर कारवाया करतांना जनतेला असेे त्रास होऊ नये, 
याची शासनाने नोंद घेऊन त्याविषयी खबरदारीची उपाययोजना करावी !
     नोएडा - नोटाबंदीमुळे शहरातील बँकेत रोकड नसल्याने मुन्नीलाल या ६५ वर्षीय वृद्ध मजुराला पैशांअभावी पत्नीवर २ दिवस अंत्यसंस्कार करता आले नाहीत. येथील जे.जे. क्लस्टरसमोरील पदपथावर पत्नीच्या मृतदेहाजवळ मुन्नीलाल २ दिवस बसून होते. तिसर्‍या दिवशी पोलीस आणि एका समाजसेवक यांनी पैसे दिल्यानंतर पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुन्नीलाल यांची पत्नी फूलमती यांचा नोएडा येथील रुग्णालयात कर्करोगाने मृत्यू झाला होता.
    मुन्नीलाल म्हणाले की, सेक्टर ९ मधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मुलाचे बचत खाते आहे. उत्तरप्रदेशातील गोंदा जिल्ह्यातून माझी दोन्ही मुले रेल्वेने निघाली आहेत; पण अजून ती पोचलेली नाहीत. माझ्या एका मुलाच्या बँक खात्यात १६ सहस्र रुपये आहेत. ते काढण्यासाठी मी बँकेत गेलो. अनेक घंटे बँकेच्या रांगेत उभा राहिलो; पण ‘बँकेत पैसेच नाहीत’, असे तेथील व्यवस्थापकाने सांगितले. मी माझ्या परिस्थितीविषयी व्यवस्थापकांना सांगितले; पण त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. (बँक अधिकार्‍याला वस्तूस्थिती सांगूनही त्याच्याकडून मानवता न दाखवली जाणे भारतियांसाठी लज्जास्पद ! अशा अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे ! - संपादक) ‘आम्ही पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे बँकेच्या एका अधिकार्‍याने सांगितले. पुन्हा बँकेत गेल्यानंतर ‘रोकड आलीच नाही’, असे तेथील अधिकारी म्हणाले, असे लाल यांना सांगण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn