Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डीजेसारख्या संगीतप्रकारावर सरकारने बंदी घालावी ! - मुंबई उच्च न्यायालयाचे मत

प्रत्येक गोष्ट न्यायालयाला का सांगावी लागते ? सरकारच्या हे का लक्षात
येत नाही ? डीजेप्रमाणेच सनबर्नसारख्या संस्कृतीहीन कार्यक्रमांवरही सरकारने बंदी घातली पाहिजे !
     मुंबई - डीजेसारख्या संगीत प्रकारांना आळा घालण्याची आवश्यकता आहे. तसेच डीजेसाठी लागणारी वाद्ये आणि अन्य साहित्य यांचे उत्पादन अन् विक्री यांवर राज्य सरकारने बंदी घालण्याची आवश्यकता आहे. डीजेसारख्या घातक संगीत प्रकारांवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याच्या पर्यायांचा विचार झाला पाहिजे, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. डीजे हा संगीत प्रकार अत्यंत घातक असून त्यावर बंदी घालण्याची आवश्यक याचिकाकर्ते महेश बेडेकर यांच्या अधिवक्त्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. (घातक संगीत प्रकारावर बंदी आणण्यासाठी न्यायालयीन लढा देणारे महेश बेडेकर यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यावर उच्च न्यायालयाने हे मत नोंदवले आहे.
     ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणार्‍या ध्वनीप्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना ध्वनीमापक यंत्रे उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्‍वासन राज्य सरकारकडून उत्तरादाखल देण्यात आले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn