Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अबू आझमींचा लोकशाहीद्रोह !

संपादकीय
     भारतात देशद्रोही आणि हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांना अजूनही मानाचे स्थान आहे, असेच म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. कारवाईच्या भीतीने ते भारतातून पसार झाले आहेत; पण त्यांच्या चाहत्यांची संख्या भारतात उदंड आहे. यांत बहुतांश राजकीय पक्षातील धर्मांध नेत्यांचाही समावेश आहे. काही उघड पाठिंबा देतात, तर काही छुपा. त्यांना उघड पाठिंबा देणार्‍यांमध्ये समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांचा क्रमांक वरचा आहे. आझमी यांचे आतंकवादीप्रेम लपून राहिलेले नाही. मध्यंतरी काही आतंकवाद्यांना आश्रय दिल्याचे आणि त्यांना आर्थिक साहाय्य केल्याचेही समोर आले होते. समस्त धर्मांधांचे प्रतिनिधित्व करणे, हे त्यांना त्यांचे आद्य कर्तव्य वाटते. त्यामुळेच ते देशद्रोही आणि हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांची वारंवार पाठराखण करतांना दिसतात. आताही त्यांनी डॉ. झाकीर नाईक यांचे गुणगान गाण्यासाठी विधानसभेच्या सभागृहाचा वापर केला. ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर कारवाई केल्याने १२५ मुसलमान विद्यार्थ्यांची हानी झाली’, असा शोध त्यांनी लावला आहे. बांगलादेशाची राजधानी असलेल्या ढाक्यातील ‘कॅफे हाऊस’वर आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्यांतील एक म्हणजे डॉ. झाकीर नाईक हे या आतंकवाद्यांचे प्रेरणास्थान होते. त्यानंतर केवळ भारतातीलच नव्हे, जर जगात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या आतंकवाद्यांनी हेच सूत्र वारंवार सांगितले. डॉ. झाकीर नाईक यांनी चालवलेल्या विविध संस्थाही हेच उद्योग करतात. असे असतांनाही विधानसभेत औचित्याच्या तासाला अबू आझमी बेधडकपणे डॉ. झाकीर नाईक यांची तळी उचलतात, हे संतापजनक आहे. औचित्याच्या सूत्रात मांडण्यासाठी त्यांनी वेगळी सूत्रे दिली होती; मात्र ही सूत्रे बाजूला सारत त्यांनी डॉ. झाकीर नाईक यांचे गुणगान गायले. हा लोकशाहीद्रोह आहे. 
विधानसभेचे पावित्र्य भंग झाले !
      संसद किंवा विधानसभा यांना लोकशाहीचे मंदिर समजले जाते. लोकांच्या समस्या धसास लावणे, लोककल्याणार्थ योजना अधिकाधिक सक्षमपणे राबवण्यासाठी चर्चा होणे अथवा नियोजन होणे यांसाठी या सभागृहांचा वापर होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही अनेक समस्या आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटलेले नाहीत, नोटाबंदीमुळे लोकांचा उद्रेक होत आहे, अनेक योजना रखडल्या आहेत. या समस्या मांडायला आझमी यांच्याकडे वेळ नाही. लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर त्यांनी सामान्य माणसासाठी नव्हे, तर डॉ. झाकीर नाईक यांच्यासाठी केला. लोकशाहीची अशी विटंबना करण्यास आझमी का धजावले ? ‘मी सभागृहाचे पावित्र्य कितीही भंग केले, आतंकवाद्यांची कितीही पाठराखण केली, तरी माझे कुणीही काहीही बिघडवू शकणार नाही’, याची बहुदा खात्रीच आझमी यांना असावी. लोकराज्याची ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. आज विधानसभेत डॉ. झाकीर नाईक यांची तळी उचलली गेली. भविष्यात बुरहान वानी, हाफीज सईद अथवा बगदादी यांच्या हितासाठी लोकशाहीची मंदिरे समजल्या जाणार्‍या या वास्तूंमध्ये चर्चा झाली, तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. हे रोखण्याची धमक भारतीय कायद्यांमध्ये नाही का ? कि त्यांचा वापर करण्यात शासनकर्ते अल्प पडत आहेत ?
     तसे पाहिले, तर अलीकडे ही सभागृहे जनतेच्या समस्यांवर होणार्‍या चर्चांसाठी गाजत नाहीत, तर तेथे लोकप्रतिनिधींकडून घातलेला गोंधळ, वापरलेले अपशब्द आणि केलेली मारहाण यांमुळे गाजतात. लोकशाहीच्या मंदिरात होणारे हे अपप्रकार रोखण्याचे दायित्व लोकप्रतिनिधींचे आहे ! 
आझमी यांच्यावर कारवाई होणार का ?
     भारतात एक वेळ आतंकवादी, नक्षलवादी यांच्यावर कारवाई होईल; मात्र ‘भारत तेरे तुकडे होंगे...’, ‘ओसामाजी’, ‘हाफीज साहेब’ असे म्हणणार्‍यांवर कारवाई होत नाही; कारण असे म्हणणार्‍यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ढाल पुढे करत भारतियांच्या मनावर वाट्टेल ते घाव घालण्याची मुभा या सर्वांना आहे. त्यांच्या विरोधात बोलणे म्हणजे महापाप समजले जाते. 
       आझमी यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी भाजपचे आमदार अनिल गोटे सरसावले आहेत. त्यांनी आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. त्यांना इतर आमदारांचीही साथ मिळत आहे. हे जरी स्तुत्य असले, तरी मुळात अशी मागणी का करावी लागते ? गोटे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कारवाई होण्यासाठी औचित्याच्या सूत्राच्या वेळी सूत्र मांडणे, अथवा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणे यांसारखे द्राविडी प्राणायम पक्षातीलच आमदाराला का करावा लागतो ? एक देशद्रोह्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया भारतात एवढी क्लिष्ट आणि वेळकाढू का आहे ? सत्ताधारी आमदारांची ही स्थिती असेल, तर सामान्य माणसाच्या मागणीला काय किंमत असेल, याचा विचारही न केलेला बरा ! काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियात देशविरोधी कृत्य करणार्‍या १५ जणांना तात्काळ मृत्यूदंड सुनावण्यात आला. भारतातही एवढ्या जलदगतीने जेव्हा देशद्रोह्यांवर कारवाई होईल, त्या वेळी त्यांची हुजरेगिरी करणारे आझमी यांच्यासारख्यांवरही खर्‍या अर्थाने जरब बसेल. यासाठी कायद्यांमध्ये पालट करून आणि त्यांचा सक्षमपणे वापर करण्याची धमक शासनकर्त्यांनी दाखवणे आवश्यक आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’सारखे धडाकेबाज निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकांच्या याविषयी मोठ्या अपेक्षा आहेत. पाकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याबरोबरच देशांतर्गत असणारे देशद्रोही आणि त्यांचे पाठीराखे यांच्यावरही ‘सर्जिकल स्ट्राईक’ होऊ द्या ! देशात शांती आणि सुरक्षितता नांदण्यासाठी तसे करणे आवश्यक आहे !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn