Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकच्या कारागृहांमध्ये ५१६ भारतीय मासेमार आणि ५७ नागरिक अटकेत !

केवळ माहिती न देता भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी
काय करणार आहात, हेही सरकारने सांगावे !
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती
    नवी देहली - पाकच्या कारागृहांमध्ये ५१६ भारतीय मासेमार आणि ५७ भारतीय नागरिक अटकेत आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेतील एका लिखित उत्तरात दिली आहे. या उत्तरात स्वराज यांनी सांगितले की,
१. उपलब्ध माहितीनुसार सध्या पाकच्या कारागृहांमध्ये ५७ भारतीय कैदी आहेत. या ५७ पैकी ३ कैद्यांच्या उपस्थितीविषयी पाककडून औपचारिक दुजोरा अद्याप मिळाला नाही.
२. वर्ष २०१३, २०१४ आणि २०१५ च्या कालावधीत पाक कारागृहातील ३ भारतीय कैदी आणि ८ भारतीय मासेमार यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत वर्ष २०१६ मध्ये १ भारतीय कैदी आणि
२ भारतीय मासेमार यांचा मृत्यू झाला आहे.
३. पाकच्या कारागृहांमध्ये अटकेत असलले सर्व भारतीय कैदी आणि मासेमार यांचे संरक्षण करणे आणि काळजी घेणे हे पाकचे दायित्व असल्याची जाणीव अनेकवेळा भारत सरकारने पाक सरकारला करून दिली आहे. ४. इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायोग नियमितपणे पाकमध्ये अटकेत असलेल्या भारतीय कैद्यांना कायदेशीर साहाय्य मिळवून देते.
५. या कैद्यांच्या संदर्भात वर्ष २००८ मध्ये भारत-पाकिस्तान न्यायिक समिती स्थापन करण्यात आली होती. यात दोन्ही देशांच्या उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश आहे. अशा प्रकरणांमध्ये कैद्यांच्या संदर्भातील वागणूक ठरवणे आणि शिक्षा संपलेल्या कैद्यांची त्वरित सुटका करण्याची शिफारस करणे आदी उद्देश या समितीचे आहेत.
६. या समितीने वर्ष २०१३ मध्ये भारताचा दौरा केला होता. आता पुढील दौरा आयोजित करण्याची वेळ पाकची आहे. या संदर्भात आम्ही पाक सरकारच्या पुढील निर्णयाची वाट पहात आहोत.
७. १ जुलै २०१६ च्या स्थितीनुसार भारतीय कारागृहांमध्ये २७० पाकिस्तानी कैदी आणि ३७ पाकिस्तानी मच्छिमार आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn