Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज (वय ८९ वर्षे) !

प.पू. पांडे महाराज
१. प.पू. पांडे महाराज यांच्या सेवेत असणार्‍या साधकांचे त्यांच्याविषयीचे मनोगत 
१ अ. प.पू. बाबा यांचे श्रेष्ठत्व आणि महानता
    ‘मागील एक वर्षापासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला प.पू. बाबांसमवेत प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता फिरण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मला पहाटे उठणे, सकाळीच संतांचे ज्ञानमोती वेचणे आणि सूक्ष्मातून प्रचंड चैतन्य मिळणे असे अनेक लाभ होत आहेत. माझे आवरण दूर होऊन मी चैतन्याने भारीत होऊन दिवसभर आनंदी रहात आहेेे. स्थुलातील आणि मायेतील मिळणार्‍या गोष्टींचा हिशोब करून आपण त्याचे उतराई होण्याचा प्रयत्न करू शकतो; मात्र प.पू. बाबा यांच्याकडून मिळणारे विचारधन आणि चैतन्य याविषयी समजून घेण्याची किंवा त्याविषयी लिहिण्याची माझी योग्यता नाही. त्यांनी मला केलेल्या साहाय्याविषयी जे स्थुलातून आकलन झाले, त्याविषयी थोडेसे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ‘शितावरून भात शिजल्याची परीक्षा करता येते’, या नियमानुसार प.पू. बाबा यांचे श्रेष्ठत्व आणि महानता काही उदाहरणावरून लक्षात येते. १ अ १. बाह्यतः कडक स्वभावाचे आणि कडक शिस्तीचे वाटले, तरी ते साधकांना घडवण्यासाठीच तसे वागत असल्याचे लक्षात येणे : ‘पूर्वी प.पू. बाबांचा माझा एवढा जवळून संपर्क होत नसे. त्या वेळी माझ्या दोषांमुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी काही गैरसमज होते, उदा. प.पू. बाबा फार कडक स्वभावाचे आणि कडक शिस्तीचे आहेत; मात्र सध्याच्या माझ्या अनुभवावरून ते अत्यंत साधे आणि निरपेक्ष आहेत. साधकांमध्ये शिस्त आणि परिपूर्ण गुरुकार्य करण्यासाठी गुण यावेत, यासाठी ते हे सर्व करतात. त्यांना वैयक्तिक स्तरावर कशाचीच आवश्यकता किंवा अपेक्षा नाही. ते स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत.
१ अ २. त्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांचा उद्देश लक्षात येणे : पूर्वी मला ‘ते कर्मकांड करणारे आहेत’, असे वाटायचे. माझ्यासारख्या सर्वसाधारण साधकाला कर्मकांडही योग्य पद्धतीने करता येत नाही; मात्र साधकांना अध्यात्माच्या प्राथमिक टप्प्यापासून ते आध्यात्मिक सूक्ष्मातील उपायापर्यंत ते शिकवत आहेत. अधिकाधिक सात्त्विकता येण्यासाठी ते प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक स्तरावर करतात.
१ अ ३. मनातील भीती सांगितल्यावर आनंदाने जवळ करणे : पूर्वी मला ‘ते एक कर्मठ ब्राह्मण आहेत’, असे वाटे. मी दलित समाजातील असल्याने माझ्यात न्यूनगंड होता आणि मी माझी प्रतिमा जपत होतो. ‘मी त्यांच्याजवळ जाऊ शकेन कि नाही’, अशी मला भीती वाटत असे. त्यांना मी हे सांगितल्यावर त्यांनी मला आनंदाने मनापासून जवळ केले. ‘एकनाथ महाराज यांनी काशीहून आणलेले गंगेचे पाणी तहानलेल्या गाढवाला पाजले. तसेच हे आहे’, असे वाटते.’
१ अ ४. ‘कलियुगात विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांनी जातीव्यवस्थेचा कलंक पुसून चातुर्वर्णाच्या आधारावर गुरुकृपायोगाद्वारे मानवजातीचे कल्याण केले आहे’ याविषयी लेख लिहिण्यास प्रोत्साहन देणे : ‘जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधु ओळखावा । देव तेथेची जाणावा ।’ या संतवचनावरून प.पू. बाबांचे देवत्व लक्षात येते. प.पू. बाबा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी माझ्याकडून एक लेख लिहून घेतला. धर्मसंस्थापना करतांना श्रीकृष्णाने जशी चातुर्वर्ण व्यवस्था केली, त्याप्रमाणेच ‘सध्याच्या कलियुगात विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांनी जातीव्यवस्थेचा कलंक पुसून चातुर्वर्णाच्या आधारावर गुरुकृपायोगाद्वारे मानवजातीचे कल्याण केले आहे’, ही गोष्ट त्या लेखातून समाजाला कळली पाहिजे’, हा समष्टीचा विचार करणारा प.पू. बाबांचा उदात्त हेतू होता.’
- श्री. शिवाजी वटकर, देवद आश्रम, पनवेल
१ आ. प.पू. पांडे महाराज यांच्या सेवेत राहिल्यापासून त्रासाची तीव्रता न्यून होणे आणि वाईट सवयी न्यून होणे
‘मी प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीच्या बाहेर असलेल्या सोफ्यावर बसून नामजप केल्यावर माझ्या मनातील नकारात्मक विचार ७० - ८० प्रतिशत न्यून होऊन आनंद मिळायला लागला. मला घरी असतांना २ - ३ चुकीच्या सवयी होत्या. त्या बाबांना प्रार्थना केल्यामुळे पूर्णपणे न्यून झाल्या आहेत. मला आता वाईट शक्तीच्या प्रकटीकरणावर नियंत्रण मिळवायला जमू लागले. माझ्या तोंडवळ्यावर २ - ३ दिवसांनी त्रासामुळे काळपटपणा यायचा. तो आता येत नाही. तोंडवळा तेजस्वी झाल्याचे जाणवत आहे. मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव होऊन मला प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाता येऊ लागले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात असतांना प.पू. बाबांचे अनुसंधान होते. अनेक वेळा बाहेर सेवेला असतांना ‘प.पू. पांडे महाराज माझ्याकडे बघत आहेत’, असा विचार असतो. त्यामुळे बाहेरही एक आदर्श साधक म्हणून वागण्याचा प्रयत्न वाढला आहे.’ - एक साधक
प.पू. पांडे महाराज यांच्या चैतन्यमय सहवासाने जागृत झालेली साधकांची प्रतिभा !
प.पू. पांडे महाराज विभूती आहे महान ।
प.पू. बाबा म्हणजे सर्व योगांचे योगी ।
आहेत हे परात्पर गुरु सत्यलोकी ।
परात्पर गुरु डॉक्टरांच्या महतीचे अखंड पारायण करूनी ।
अवतरले या भूवरी घेऊन जाण्या भक्तांना मोक्षासी ॥ १ ॥
 
गुरुदेवांचा संकल्प साकार होण्या असे त्यांचे नेहमी समर्पण ।
कशी करावी गुरुभक्ती याची देती शिकवण ।
नसे गुरुसेवेत कधीही खंड कितीही येवो आजारपण ।
त्यासाठीच ते प्रत्येक श्‍वास अन प्रत्येक क्षण करतात अर्पण ॥ २ ॥
 
करतात सतत भगवंतनिर्मित सृष्टीचे परीक्षण ।
त्याचे करतात कितीतरी सुंदर वर्णन ।
तेव्हा आम्हासी अल्पसे कळे, कसे असते भगवंताचे नियोजन ।
प्रत्येक प्रसंगातून ते घडवतात भगवंताचे दर्शन ॥ ३ ॥ 
 
मार्ग दावितात साधकांसी त्यांच्या ज्ञानामृतातून ।
त्यांच्यामुळेच अनुभवता येतात कृतज्ञतेचे क्षण ।
अन् मनी लागते सदा आस मिळावेत श्रीगुरुचरण ।
प.पू. बाबा काय आहेत, याची आम्हा जिवांना नाही जाण ॥ ४ ॥ 

परि प.पू. गुरुदेवांनी दिले आम्हांसी हे अनमोल धन ।
कसे फेडावे दोन्ही श्रीगुरूंचे ऋण ।
प.पू. पांडे महाराज विभूती आहे महान ।
जाणूनि श्रीगुरूंचे मन प्रयत्नरूपी पुष्प करतो चरणी अर्पण ॥ ५ ॥
- कु. स्नेहा झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
प.पू. बाबा परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रतिरूप ।
    एके दिवशी भावजागृतीचे प्रयत्न करतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करत होतो; परंतु प.पू. बाबांचेच स्मरण होत होते. पुष्कळ प्रयत्न करत असूनही प.पू. बाबांचेच स्मरण होत होते. तेव्हा प्रश्‍न पडला असे का ? आज त्याचे उत्तर देवाने दिले...

प.पू. बाबा परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रतिरूप ।
प.पू. बाबा आणि परात्पर गुरु डॉक्टर दोघे एकरूप ॥ १ ॥

साठवावे मनी त्यांचे स्वस्वरूप ।
आनंद मिळे मना खूप खूप ॥ २ ॥

साधण्या षड्रिपूंवर शरसंधान ।
चालू झाले देवा प.पू. बाबांशी अनुसंधान ॥ ३ ॥

परात्पर गुरूंच्या सेवेच्या निमित्ताने ।
सहवास मिळतसे प.पू. बाबांचा प.पू.च्या कृपेने ॥ ४ ॥

मन डोलत असे सेवेत सदैव आनंदाने ।
शांत होई तवचरणी कृतज्ञतेने ॥ ५ ॥

- श्री. संदेश नाणोसकर (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn